Manoj Parab: मलनिस्सारण प्रकल्पापूर्वी ग्रामस्थांशी बोला, मनोज परब

मनोज परब: लोकांना प्रकल्प नको तर आग्रह का? उंडीर येथे ग्रामस्थांसोबत घेतली सभा
Manoj Parab
Manoj ParabDainik Gomantak
Published on
Updated on

Manoj Parab: उंडीर येथील लोकांवर लादण्यात येणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पाच्या उभारणीपूर्वी आमच्याशी आणि ग्रामस्थांशी चर्चा करा, स्पष्टपणे काय ते सांगा आणि मगच निर्णय घ्या, असे मत रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी व्यक्त केले. उंडीर - बांदोडा येथे काल उंडीर ग्रामस्थ व रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातर्फे आयोजित संयुक्त सभेत मनोज परब यांनी संबोधित केले.

Manoj Parab
Drushti: बुडणाऱ्या चौघा पर्यटकांना जीवरक्षकांकडून जीवदान

लोकांना जर हा प्रकल्प नको असेल, तर आग्रह का धरता, असा सवाल करून गोमंतकीयांना त्रास देण्यापेक्षा हा प्रकल्प शापूर - बांदोड्यातील झोपडपट्टीत उभारा, असेही मनोज परब म्हणाले.

उंडीर येथील म्हारू देवस्थान सभागृहात झालेल्या या सभेला सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर तसेच आरजीचे प्रेमानंद गावडे, विश्‍वेश नाईक, शैलेश नाईक यांच्यासह म्हारू देवस्थानचे मुकुंद नाईक, तुळशीदास नाईक व सदानंद नाईक आदी उपस्थित होते.

आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, सध्याचे सरकार हे हुकुमशहा झाले आहे. गोमंतकीयांच्या हिताविरोधात वागणाऱ्या या सरकारला त्यांची जागा दाखवण्याची गरज असून राज्यात लोकांना नको असलेले प्रकल्प सध्या या सरकारकडून लादले जात असल्याने आता लोकांनीच त्याविरुद्ध पेटून उठण्याची आवश्‍यकता आहे.

Manoj Parab
Goa College Student Boycott: गोवा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार; जाणून घ्या काय घडले...

यावेळी प्रेमानंद गावडे, विश्‍वेश नाईक तसेच मंथन नाईक यांनी आपले विचार मांडून मलनिस्सारण प्रकल्पाला विरोध केला. स्वागत व सूत्रसंचालन सदानंद नाईक यांनी केले.

‘महिना पंधरा हजार किंवा रोजगार द्या’

लोकांना चांगले द्यायचे असेल, तर सुदिन ढवळीकर यांनी प्रत्येक कुटुंबाला महिना पंधरा हजार रुपये किंवा औद्योगिक वसाहतीत कायमस्वरूपी नोकरी युवक-युवतींना द्यावी. जर हे सुदिन ढवळीकर यांनी करून दाखवले, तर आपण कायम त्यांच्या सेवेत राहू, असे मनोज परब म्हणाले.

‘झोपडपट्टीला अभय देण्याचे सरकारचे धोरण’

भाजप सरकारकडून गोमंतकीयांच्या घरादारांवर वरवंटा फिरवण्याचा प्रकार सध्या सुरू असून बिगर गोमंतकीयांच्या झोपडपट्टीला अभय देण्याचे धोरण या सरकारने आखले आहे. अशा सरकारला घरी पाठवण्याची आज खरी गरज आहे. तुमचे हित न जपणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवायला हवी. दुर्गंधी पसरवणारा हा प्रकल्प उभारून लोकांना बेघर करण्याचा हा प्रकार असून ग्रामस्थांनी एकजुटीने व एकसंध राहून या प्रकल्पाला विरोध करावा. आरजीवाले तुमच्यासोबत राहतील, अशी ग्वाहीही मनोज परब यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com