Panaji News : ताळगाव ते सांताक्रुझ रस्ता बनतोय धोकादायक

वाहनांची वर्दळ वाढली ः रुंदीकरण करण्याची चालकांची मागणी
सांताक्रुझ रस्ता
सांताक्रुझ रस्ताgoamantak digital team

पणजी : ताळगाव व सांताक्रुझ या दोन मतदारसंघांना जोडणाऱ्या अरुंद रस्त्यावरील वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हा रस्ता वाहन चालकांसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्याच्या बाजूने नारळाची झाडे असल्याने वाहनांना बाजू घेताना मुष्किलीचे बनत आहे. दक्षिण गोव्यातून पणजीत येणाऱ्यांसाठी हा रस्ता सोयीस्कर बनला आहे. त्यामुळे त्यावरील वाहनांची संख्या वाढल्याने या रस्त्याची रुंदी वाढवण्याची मागणी होत आहे.

पणजी शहरातील बहुतेक शाळा व महाविद्यालये कुजिरा येथे स्थलांतर झाल्यापासून हा रस्ता अधिक व्यस्त बनला आहे. पणजी, ताळगाव, दोनापावल तसेच आजूबाजूच्या भागातील मुलांना पालक शाळेमध्ये सोडण्यासाठी कुडका हे अंतर जवळ असल्याने याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे सकाळ व संध्याकाळी अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.

रस्त्याच्या बाजूने नारळाची झाडे असल्याने दोन चारचाकी वाहने एकमेकाच्या विरुद्ध दिशेने आल्यास बाजू घेताना कसरत करावी. या रस्त्यावर रात्रीच्यावेळी दिवाबत्ती नसते. तेथे पदपथ आहेत. मात्र, ते बहुतेकवेळा बंदच असतात. त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहनांसाठी धोका अधिक उद्‍भवतो. या रस्त्यावर किरकोळ अपघात हे घडतच असतात.

सांताक्रुझ रस्ता
Goa Accident News : डिचोलीतील अपघातांत आजोबा ठार; नातीसह दोघे जखमी

पोलिसांचे दुर्लक्ष; गैरप्रकार सुरू

अवजड वाहनांना सकाळच्या सत्रात शहरात येण्यास बंदी आहे. त्यामुळे दक्षिणेतून येणारे चिरे व रेतीचे ट्रक पणजी शहरात न जाता ते सांताक्रुझ ते ताळगाव या रस्त्याचा वापर करतात. यामुळे वाहतुक कोंडीत भर पडते. या रस्त्यावर एक छोटा पूल आहे, येथे रात्री उशिरा काहीजण दारू पितात. अनेकदा काही आंबटशौकीनही येथे आढळतात. पणजी आणि जुने गोवे पोलिसांनी यासारख्या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी गस्त घालण्याची गरज आहे.

सांताक्रुझ रस्ता
Goa Theft Case : बसमधून दोन महिलांच्या सोनसाखळ्या चोरीला केपेत चोरट्यांचा धुमाकूळ

...यामुळे रखडले काम

१ काही वर्षापूर्वी या रस्त्याची रुंदी वाढवण्याचा प्रयत्न सांताक्रुझचे माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, ताळगावचे माजी आमदार बाबुश मोन्सेरात यांनी केला होता.

२भूसंपादनासाठी काम सुरू झाले होते. मात्र. रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतजमिनीच्या मालकांनी त्याला विरोध दर्शविला होता. जमीनमालकांना त्यावेळच्या मार्केट दराने रक्कम हवी होती.

३ मध्यंतरी मोन्सेरात यांनीही लक्ष काढून टाकले. त्यामुळे मागणीची धार कमी झाली. पण आताची परिस्थिती पाहता सरकारने रुंदीकरणासाठी पावले उचलावीत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com