LLB Admission Scam: कारे महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात कडक कारवाई करा; NSUI ची राज्यपालांकडे मागणी

शिष्टमंडळाने घेतली भेट; पुढील वर्षीपासून गोवा विद्यापीठाने परीक्षा घेण्याची मागणी
NSUI Meets Governor On LLB Admission Scam
NSUI Meets Governor On LLB Admission ScamDainik Gomantak
Published on
Updated on

NSUI Meets Governor On LLB Admission Scam: विधी महाविद्यालयातील एलएलबी प्रवेश परीक्षेतील घोळा संदर्भात आज, मंगळवारी एनएसयुआयच्या शिष्टमंडळाने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली. प्रवेश प्रक्रिया या विषय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे.

त्यामुळे कारे महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले आहे.

NSUI Meets Governor On LLB Admission Scam
Dabolim Airport Taxi Counter: दाबोळी विमानतळावर स्थानिक टॅक्सीचलाकांना डावलले; दिल्ली-बिहारमधून आणले 120 चालक

या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकार थांबविण्यासाठी पुढील वर्षीपासून गोवा विद्यापीठाने ही प्रवेश परीक्षा घ्यावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यापुर्वी एनएसयुआयने 3 जून रोजी गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांचा भेट घेत या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी केली होती.

यावर्षी परीक्षा घेण्याची जबाबदारी कारे विधी महाविद्यालयाकडे सोपविण्यात आली होती. पण त्यांनी ती नियमानुसार घेतलेली नाही. प्रचलित नियमानुसार 12 वीच्या परीक्षेतील गुण व प्रवेश परीक्षा यामधील गुणांची समान बेरीज गृहीत धरण्यात येत असतात.

NSUI Meets Governor On LLB Admission Scam
Goa Monsoon 2023: सावधान ! गोव्यात 'ऑरेन्ज अलर्ट', पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा

पण अचानक यावर्षी 12वीच्या परीक्षेतील गुण विचारात न घेण्याचा निर्णय कारे विधी महाविद्यालयाने घेतला होता. कारे आणि साळगावकर विधी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना चौकशी समितीला सामोरे जावे लागले आहे.

आतापर्यंतच्या चौकशीमध्ये ज्या पद्धतीने प्रवेश परीक्षा घेतली, त्याबद्दल समिती फारशी खुश नाही. अचानक बदललेल्या पद्धतीमुळे विद्यार्थांचा खेळखंडोबा झाला. अशी परीक्षा पद्धत बदलण्याचा हेतू केवळ आपल्या पुत्रावर मेहेरनजर करण्याचा होता.

कारे महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विद्यापीठाने तशी कोणतीही मान्यता दिली नव्हती. तथापि, प्राचार्यांनी यासंबंधीची मान्यता घेतली होती, असे जाहीर केले होते. त्यामुळे कुलगुरू चिडले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com