वाक् चातुर्यावर आधारीत उपलब्ध व्यवसायांचा लाभ घ्या : संगीता अभ्यंकर

केवळ वाणी शुद्ध किंवा वाणीवर प्रभुत्व असुन चालणार नाही. आपले वेगळेपण दाखवायचा असेल तर प्रथम स्वतातील गुण शोधावे लागतील किंवा ते ओळखता आले पाहिजेत.
संगीत अंभ्यकर
संगीत अंभ्यकर Dainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: आपले वाणीवर (voice) प्रभुत्व असेल तर त्याचा सुत्रसंचालनात (Anchoring) उपयोग कसा करावा हे पण कळणे तितकेच महत्वाचे आहे. वाणी शुद्ध किंवा त्यावर प्रभु्त्व असेल तर केवळ सुत्रसंचालन हा केवळ एकच पर्याय नाही. वाक्चातुर्यावर आधारीत अनेक व्यवसाय उपलब्ध आहेत, त्याचा तरुणांनी यथायोग्य उपयोग करावा असे आवाहन प्रसिद्ध गोमंतकीय सुत्रसंचालक संगीत अंभ्यकर (Sangeet Ambhyakar) यांनी केले. संगीता अभ्यंकर या फोंडा येथील गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या उच्च माध्यमिकमध्ये अध्यापक आहेत.

पलाश अग्नी स्टुडिओजने नित्य अनंत क्रिएशन्स व थींक एण्ड इंकच्या सहकार्याने आयोजित केलेल्या सुत्र सप्तक या सुत्रसंचालन मालिकेतील "आपली निवेदन शैली - आपली ओळख" या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.

वाक् चातुर्यावर आधारीत जे व्यवसाय आहे त्यांत सुत्रसंचालक, निवेदक, निरुपणकार, मुलाखतकार,, संवादक, कीर्तनकार, वक्ता, कथाकथन, कथावाचक, अभिवाचन, नाट्यवाचन, प्रवचनकार, आकाशवाणी किंवा टिव्हीवर बातमी सांगणारा, भाषांतरकार, चर्चा सत्रे, कार्यक्रमाचे संयोजन करणारा, वर्तमानपत्र किंवा टिव्ही पत्रकार, विनोदी, नक्कल करणारा कलाकार, अशी अनेक उदाहरणे तिने दिली.

संगीत अंभ्यकर
कोकण-रेल्वे मार्गावरील वाहतुक 6 तासांत पुन्हा सुरु

गोव्यात, देशात व जगात वर्षभर असे अनेक कार्यक्रम होत असतात ज्यांना वरील व्यवसायिकांची गरज लागते. आपण व गोव्यातील माझे इतर सुत्रसंचालक मित्र-मैत्रिणींना सुत्रसंचालन करताना व्यवसायिकतेसाठी जे गुण आत्मसात करावे लागतात ते आम्ही करु शकलो नाही. आम्ही सुत्रसंचालनाकडे एक छंद, आवड, याच दृष्टिने पाहिले असेही अभ्यंकर यांनी सांगितले. आता अनेक संधी उपलब्ध आहेत. या सेंधीचा तरुणांनी लाभ घ्यावा असे त्या म्हणाल्या.

केवळ वाणी शुद्ध किंवा वाणीवर प्रभुत्व असुन चालणार नाही. आपले वेगळेपण दाखवायचा असेल तर प्रथम स्वतातील गुण शोधावे लागतील किंवा ते ओळखता आले पाहिजेत. ज्या कार्यक्रमाचे आपण सुत्रसंचालन करतो त्यातील बारकावे, माहिती असणे गरजेचे आहे. शिवाय सुत्रसंचालकाने दुसऱ्या सुत्रसंचालकाची, निवेदकाची नक्कल करु नये, कारण प्रत्येकाची शैली वेगळी असते असा सल्लाही तिने दिला.सुत्रसंचालकला विनोद बुद्धी, हजरजबाबीत्पयानेणा हे गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. त्याने भाषेबद्दलचा न्युनगंड बाळगु नये व जितक्या जास्त भाषा येतात तितकाच सुत्रसंचालक प्रेक्षकांना आकर्षित करु शकतो व त्यामुळे त्याच्यासाठी अनेक संस्कृतीचे दरवाजे उघडल्याचा प्रत्यय येईल असे त्या शेवटी म्हणाल्या.आजच्या सत्राचे संयोजन खुशी प्रभुदेसाई हिने केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com