Goa Drug Case: 'स्‍विगी डिलिव्हरी बॉय' निघाला ड्रग्स तस्कर, सांकवाळमध्‍ये 22 हजाराच्या गांजासह एकाला अटक

Swiggy delivery boy arrested Goa: ‘स्‍विगी’च्‍या ‘डिलिव्‍हरी बॉय’ला रविवारी रात्री अटक करून अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) त्‍याच्‍याकडून २२६ ग्रॅम वजनाचा आणि सुमारे २२,६०० रुपये किमतीचा गांजा जप्‍त केला.
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: खाद्यपदार्थांसोबतच गांजाचीही वाहतूक करणाऱ्या राहुल उप्पलदिन्नी (वय ३३, रा. वाडे-वास्को) या ‘स्‍विगी’च्‍या ‘डिलिव्‍हरी बॉय’ला रविवारी रात्री अटक करून अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) त्‍याच्‍याकडून २२६ ग्रॅम वजनाचा आणि सुमारे २२,६०० रुपये किमतीचा गांजा जप्‍त केला.

या घटनेमुळे राज्‍यात खळबळ उडाली असून ऑनलाईन पद्धतीने घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या ‘स्‍विगी’सह इतर कंपन्‍या पोलिसांच्‍या निशाण्‍यावर आल्‍या आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना खाद्यपदार्थ पोहोचवणाऱ्या कंपनीचे एजंट सांकवाळ परिसरातील काहीजणांना गांजा पुरवत असल्‍याची माहिती पोलिसांना प्राप्‍त झालेली होती.

त्‍यानुसार ‘एएनसी’च्‍या पथकाने रविवारी उपासनगर-सांकवाळ येथे छापा टाकून राहुल उप्पलदिन्नी या वाडे-वास्को येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय युवकास ताब्‍यात घेतले. त्‍याची झडती घेतली असता, त्‍याच्‍याकडे २२६ ग्रॅम वजनाचा आणि सुमारे २२,६०० रुपये किंमत असलेला गांजा आढळून आला. त्‍यानंतर त्‍याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

संशयित उप्‍पलदिनी याच्‍याकडून पोलिसांनी डिलिव्हरीसाठी वापरलेली दुचाकी व मोबाईलही जप्त केला आहे.

Goa Drug Case
Goa Festival: ‘गोंयकारांनो’ उठा! नृत्य-संगीताच्या आवाजात महत्वाचे प्रश्न विसरू नका; सणांत घुसलेले राजकारण

‘एएनसी’च्‍या अधीक्षक सुनिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क, निरीक्षक सजीथ पिल्लई, संदीप कोनाडकर, राहुल गावस, साईराज नाईक, मकरंद घाडी, योगेश माडगावकर यांच्‍या पथकाने ही कारवाई केली. दरम्‍यान, या प्रकरणी विभागाकडून सखोल तपास सुरू असल्‍याची माहिती सुनिता सावंत यांनी ‘गोमन्‍तक’शीबोलताना दिली.

सरदेसाईंनीही व्‍यक्त केली होती भीती

नुकत्‍याच झालेल्‍या पावसाळी अधिवेशनात गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनीही हा विषय सभागृहात आणला होता. संविधानानुसार, कोणत्‍याही राज्‍यातील व्‍यक्तीला गोव्‍यात येऊन काम करण्‍याचा अधिकार आहे, परंतु खाद्यपदार्थांची डिलिव्‍हरी करण्‍याचा गोव्‍यात सुरू असलेला व्‍यवसाय विश्‍‍वास ठेवता येण्‍यासारखा नाही, असेही त्‍यांनी म्‍हटले होते. रविवारी सांकवाळचा विषय समोर येताच गोवा फॉरवर्डने सोशल मीडियाद्वारे सरदेसाईंनी भीती व्‍यक्त केलेला व्‍हिडिओ पोस्‍ट केला आहे.

Goa Drug Case
Goa Crime: एकाच दिवशी चार मृतदेह सापडल्याने खळबळ! जुने गोवेत दोन, पणजी व आमोणेत प्रत्येकी एक मृत्यू

नियंत्रणासाठी कडक उपाययोजना! गोमंतकीयांना ऑनलाईन पद्धतीने खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्‍यांच्‍या कर्मचाऱ्यांकडून डिलिव्‍हरीच्‍या माध्‍यमातून गांजा पुरवण्‍यात येत असल्‍याच्‍या प्रकारामुळे अमलीपदार्थविरोधी विभाग खडबडून जागा झाला आहे. अशा प्रकारांवर नियंत्रण आणण्‍यासाठी कडक उपाययोजना आखण्‍याचा निर्णय विभागाने घेतल्‍याची माहिती सुनिता सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com