Sweden Delegation in Goa: पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पातील अडचणींवर स्वीडन देणार 'सोल्युशन'

स्वीडनचे शिष्टमंडळ गोव्यात; स्मार्ट तंत्रज्ञानासह नवकल्पना शेअर करणार
Sweden Delegation in Goa
Sweden Delegation in GoaDainik Gokmantak

Sweden Delegation in Goa: गोव्याची राजधानी पणजी स्मार्ट सिटीच्या विविध कामांमुळे सध्या चर्चेत आहे. या कामातील काही त्रुटी समोर येत आहेत. शिवाय स्मार्ट सिटीच्या कामात तीन वेळा वाहनांचे अपघात झाले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभुमीवर आता युरोपमधील स्वीडन या देशाच्या शिष्टमंडळाने पणजी शहराला भेट दिली.

स्वीडनच्या या शिष्टमंडळाने स्मार्ट सिटी आणि इनोव्हेशन या क्षेत्रातील चर्चेसाठी ही भेट दिली आहे. त्यामुळे राज्यातील स्मार्ट सिटीच्या कामात हे शिष्टमंडळ सोल्युशनही देणार आहे.

Sweden Delegation in Goa
Goa Traffic Rule: वाहनचालकांनो सावधान! आता दोनदा अपघात झाल्यास लायसन्स होणार रद्द...

स्मार्ट सिटी क्षेत्रात संधी शोधण्याच्या प्रयत्नात, स्वीडिश शिष्टमंडळ गोव्यात आले आणि त्यांनी राज्य सरकारच्या विविध खात्यांशी, खाजगी संस्थांशी, प्रतिनिधींशी चर्चा केली. परस्पर सहकार्य आणि विचारांची देवाणघेवाण वाढवणे हा या भेटीचा उद्देश आहे.

शिष्टमंडळाने पणजीत सध्या सुरू असलेल्या स्मार्ट सिटी उपक्रम आणि दोन्ही राष्ट्रांमधील सहकार्याच्या संभाव्य संधींवर चर्चा झाली..

याआधी या शिष्टमंडळाने पुणे आणि मुंबई येथेही भेट देत पाहणी केली आहे. या भेटीमुळे स्वीडन आणि भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील आणि स्मार्ट शहरे आणि इनोव्हेशन क्षेत्रात भविष्यातील सहकार्याचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे.

मुंबईतील स्वीडनच्या कॉन्सुलेट जनरल, विनोवा (Swedish Governmental Agency for Innovation Systems), आयव्हीएल स्वीडिश पर्यावरण संशोधन संस्था यांनी संयुक्तपणे या भेटीचे आयोजन केले होते. शिष्टमंडळात स्वीडनच्या सरकारी संस्था, कंपन्या, एनजीओ आणि शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.

Sweden Delegation in Goa
Panaji Smart City : 'स्मार्ट सिटी'च्या कामात 1 हजार कोटींचा घोटाळा?

स्वीडन शेअर करणार अनुभव आणि कार्यपद्धती

मुंबईतील स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल अॅना लेकवॉल म्हणाल्या, "स्वीडन हे शाश्वत शहरी विकासात अग्रेसर आहे. तेथील अनेक शहरे टिकाऊपणा, स्मार्ट तंत्रज्ञान आणि नवकल्पना या बाबतीत उच्च स्थानावर आहेत. हे शिष्टमंडळ त्यांचे कौशल्य भारतात आणेल.

शिष्टमंडळ ज्या शहरांमध्ये भेट देईल तिथे भारतीय समकक्षांशी ते त्यांचे अनुभव आणि सर्वोत्तम पद्धती शेअर करणार आहेत. स्वीडन आणि भारत शाश्वत शहरी उपायांसाठी एकमेकांना सहकार्य करतील. या भेटीमुळे आम्हाला एकमेकांकडून शिकण्याची आणि आणि मदतीची संधी मिळेल.

या भेटीमुळे स्वीडन आणि भारत संबंध अधिक दृढ होतील. स्मार्ट सिटी आणि इनोव्हेशन क्षेत्रात भविष्यातील सहकार्याचा मार्ग मोकळा होईल.”

या संस्थांशी केली चर्चा...

स्वीडनच्या या शिष्टमंडळाने यावेळी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि BITS पिलानी सारख्या संस्थांनाही भेटी देऊन चर्चा केली. अक्षय्य ऊर्जा, कचरा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रात कार्यरत स्थानिक कंपन्यांना स्वीडिश कंपन्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीसोबत कंपन्यांचे मॅचमेकिंग सत्र देखील झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com