Swayampurna Goa : गोव्याकडून आसामला स्वयंपूर्णतेचे धडे!

'' स्वयंपूर्ण गोवा आणि मित्र 'संकल्पना आसाम मध्ये राबवणार
Delegation of Assam Administration Visit Goa
Delegation of Assam Administration Visit GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Swayampurna Goa : राज्यात यशस्वी ठरत असलेली '' स्वयंपूर्ण गोवा आणि मित्र '' संकल्पना आता आसाम मध्ये राबवण्यासाठी आसाम सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.

या संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी आसामच्या प्रशासनाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ 2 दिवसाच्या गोवा दौऱ्यावर आहे. या दोन दिवसीय दौऱ्यात हे शिष्टमंडळ या संपूर्ण योजनेची माहिती घेईल. अशी माहिती स्वयंपूर्ण गोवा संकल्पनेचे नोडल ऑफिसर विजय सक्सेना यांनी दिली.

Delegation of Assam Administration Visit Goa
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उत्तरेत भाजपचे काम सुरू

सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार आसाम सरकारच्या प्रशासनातील सार्वजनिक व्यवस्था आणि ग्रामीण विकास आयुक्त बिक्रम कैरी, सहाय्यक आयुक्त श्रीमती बिपिनची दत्त, बिपुल दास, अतिरिक्त आयुक्त जयंत गोस्वामी, प्रकल्प व्यवस्थापक अनामिका डे यांचे आसामचे शिष्टमंडळ गोव्यात आले आहे.

प्रामुख्याने स्वयंपूर्ण गोवा आणि स्वयंपूर्ण मित्र ही संकल्पना हे शिष्टमंडळ संपून समजावून घेणार असून ही योजना राज्यातील ग्रामीण विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी कशी उपयुक्त आहे याची माहिती मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

increased FAR new rules
Indian air Force Cargo Plane Accident Assam
cbse class 12 osm website data leak ethical hacker nisarga adhikari coempt edutech sarthak siddhant supreme court revaluation scam
EPFO 3.0 Digital Services
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com