
म्हापसा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘विकसित भारत’च्या दृष्टिकोनातून आपला देश प्रगती करत आहे. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपले राज्य देखील युवक, महिला, शेतकरी व गरीबांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करत आहे. लोकांनी स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देऊन देशाला बळकटी हातभार लावावा, असे आवाहन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले.
म्हापसा येथील प्रशासकीय संकुलात देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर खंवटे हे उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर, उपजिल्हाधिकारी वर्षा परब, पांडुरंग गाड, मामलेदार अनंत मलिक, माजी उपसभापती उल्हास अस्नोडकर, वरिष्ठ अधिकारी दशरथ रेडकर व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण लाल बहादूर शास्त्री, सुभाषचंद्र बोस व इतर स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करतो. लोकमान्य टिळक आणि त्यांचे स्वराज्याचे स्वप्न व सुभाषचंद्र बोस यांचा क्रांतिकारी उत्साह आपल्याला प्रेरणा देतो. या नेत्यांचे विचार आपणला राष्ट्र उभारणीस फायदेशीर ठरतात, असे खंवटे म्हणाले.
धारबांदोडा, वाळपई, पणजी व पर्वरी या चार ठिकाणी नवीन कॉमन सर्व्हिस सेंटर स्थापन केले जाणार आहे. ज्यामुळे डिजिटल सेवांपर्यंत लोक सहज पोहोचू शकतील. शिवाय ‘हर घर फायबर’ प्रकल्प पर्वरी, साखळी व डिचोली येथे प्रायोगिक तत्वावर राबविला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.