Goa Agriculture: आरोग्यमंत्र्यांचा 'शेती' सल्ला, म्हणाले बागायती टिकवण्यासाठी युवकांनी...

सरकार नेहमीच विविध योजनांद्वारे कृषी क्षेत्रात बळकटी येण्यासाठी सदोदित कार्यरत राहिलेले आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी वाळपईत सांगितले.
Goa Agriculture
Goa AgricultureDainik
Published on
Updated on

Goa Agriculture: सरकार नेहमीच विविध योजनांद्वारे कृषी क्षेत्रात बळकटी येण्यासाठी सदोदित कार्यरत राहिलेले आहे. शेतीत आधुनिक पध्दतीचा शिरकाव झालेला आहे. पूर्वजांनी खूपच परिश्रमाने शेती,बागायती टिकवल्या. ही शेती, बागायती टिकवण्यासाठी युवकांनी शेतीकडे वळले पाहिजे, असे मत आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी वाळपईत व्यक्त केले.

वाळपई येथे मंगळवारी कृषी खात्याच्या सत्तरी विभागीय इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रमात राणे बोलते होते. राणे यांच्या हस्ते कृषी भवन - इमारतीची पायाभरणी करण्यात आली.

ते पुढे म्हणाले, आपण कृषिमंत्री असताना शेतीसाठी मोफत यंत्रे दिली होती. सत्तरी तालुक्यासाठी नवीन इमारत बांधकाम हाती घेण्यात आले आहे. उत्तम शेती केल्यास त्याचा लाभही होईल, त्यासाठी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.

Goa Agriculture
Mountain Harvesting: अवैध डोंगरकापणीमुळे गोव्याचं निसर्ग सौंदर्य होतयं नष्ट

व्यासपीठावर आमदार डॉ. दिव्या राणे, कृषी खात्याचे संचालक नेविल अल्फान्सो, वाळपई नगराध्यक्ष शेहझीन शेख, उपनगराध्यक्ष अनिल काटकर, होंडा जिल्हा पंचायत सभासद सगुण वाडकर, केरी जिल्हा पंचायत सभासद देवयानी गावस, नगरगाव जिल्हा पंचायत सदस्य राजश्री काळे, केरी सरपंच दीक्षा गावस, मोर्ले सरपंच अमित शिरोडकर, पर्ये सरपंच रती गावकर, होंडा सरपंच शिवदास माडकर.

तसेच पिसुर्ले सरपंच देवानंद परब, भिंरोडा सरपंच उदयसिंग राणे, खोतोडा सरपंच नामदेव राणे, म्हाऊस सरपंच सोमनाथ काळे, ठाणे सरपंच सरिता गावकर, नगरगाव सरपंच संध्या खाडीलकर, गुळेली सरपंच नितेश गावडे, कृषी अधिकारी विश्वनाथ गावस उपस्थित होते.

Goa Agriculture
Goa Electricity: गोयकारांना बसणार वीजदरवाढीचा शॉक! 6 टक्के दरवाढ प्रस्तावित, विरोधक आक्रमक

संचालक नेविल अल्फान्सो यांनी प्रस्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते नामफलकाच्या अनावरण करण्यात आले. सूत्रसंचालन देऊ झोरे यांनी केले तर विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी आभार व्यक्त केले.

आधुनिक तंत्रज्ञान मिळणार

डॉ. दिव्या राणे म्हणाल्या, कृषिमंत्री रवी नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सहकार्यामुळे 1 कोटी 99 लाख रुपये खर्चून ही कृषी इमारत बांधली जाणार आहे. यामुळे या भागातील शेतकरी बांधवांना शेती संदर्भात या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे.

सत्तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांना आधुनिक ज्ञान-तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करणे शक्य होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com