Mountain Harvesting: अवैध डोंगरकापणीमुळे गोव्याचं निसर्ग सौंदर्य होतयं नष्ट

अवैध डोंगरकापणीकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष - कुर्टी, बेतोडा परिसराला सर्वाधिक फटका
Illegal Mountain Harvesting
Illegal Mountain HarvestingDainik Gomantak
Published on
Updated on

Mountain Harvesting: राज्यातील अवैध डोंगरकापणीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. गोव्याचा सुंदर निसर्ग ओरबडून सगळे विद्रूप करण्याचा जणू निश्‍चयच गोवा विकण्यासाठी तयार झालेल्या लोकांनी केल्यामुळे शेवटी पुढील पिढीच्या हाती काय राहील, हाच खरा यक्ष प्रश्‍न आहे.

तालुक्यातील विविध पंचायतीत आपल्या सोयीनुसार ही डोंगर कापणी सुरू असते, आणि ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप'' असा प्रकार असल्यामुळे सरकारी यंत्रणा डोळे झाकून काम करीत असल्याने अशा अवैध कामाला अभयच मिळत आहे.

सर्वाधिक अवैध डोंगर कापणी ही कुर्टी - खांडेपार तसेच बेतोडा - निरंकाल पंचायतीत होत असल्याचे समोर आले आहे.

कुर्टी आणि बेतोडा पंचायती फोंडा शहराच्या वेशीवरच असल्याने उपनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुर्टी भागाला तर या डोंगर कापणीचा शापच लागला आहे. सरकारी यंत्रणा मात्र आवश्‍यक सहकार्य करीत नाही, असा आरोपही आहे. फोंड्याचा सुंदर निसर्ग नष्ट करून काँक्रिटची जंगले उभारण्याचा प्रयत्न सफल होताना दिसत आहे.

नाव विकासकामांचे!

फोंडा तालुक्यातील चौपदरी रस्ते तसेच इतर कामांसाठी खोदकाम करण्यात आले. आता हे चौपदरी रस्ते आवश्‍यक असले तरी त्यात नियोजन असायला हवे. वारेमाप उत्खनन आणि डोंगर कापणी करून आपण नेमका कोणता विकास साधणार आहोत, हा खरा प्रश्‍न आहे.

विकासकामे हवीतच, पण या विकासकामांच्या नावाखाली गोवा भकास करण्याचे प्रयत्न चालले आहेत, असा हा आरोप आहे.

Illegal Mountain Harvesting
ST Reservation: एसटी बांधवांना राजकीय आरक्षण द्या; गोवेकरांचे थेट राष्ट्रपतींना निवेदन

आरटीआय, सामाजिक कार्यकर्त्यांमुळे चाप !

तसे पाहिले तर या अवैध डोंगर कापणीविरुद्ध आरटीआय आणि सामाजिक कार्यकर्तेच आवाज उठवताना दिसतात. कुर्टी - खांडेपार तसेच इतर पंचायतीतील या सामाजिक कार्यकर्त्यांच्या जागरुकतेमुळे काही अंशी अशा अवैध डोंगर कापणी आणि बेकायदेशीर बांधकामांना चाप बसला आहे, पण हा चाप पूर्णपणे नाही, ही खंत या सामाजिक कार्यकर्त्यांना आहे.

कडक कारवाई करा!

अवैध कामांविरुद्ध आमच्यासारख्या लोकांनी तक्रारी दिल्यानंतर मग कुठे तरी हालचाल होते. अशा कामासाठी नियुक्त केलेल्या भरारी पथकाने गस्त घालून रोखायला हवे.

अवैध डोंगर कापणीसारखी कामे करणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी, कारण सुंदर गोव्याला विद्रूप करण्याचे आणि पर्यावरणाचा नाश करण्याचे काम काही नतद्रष्टांकडून होत असल्याने त्यांना चाप हा बसायलाच हवा. - संदीप पारकर, आरटीआय कार्यकर्ता, खांडेपार.

Illegal Mountain Harvesting
Goa Taxi: आमकां भिक नाका! ‘मोपा’संदर्भात टॅक्सीचालक आक्रमक, पेडणेत आंदोलन

विद्रुपीकरण थांबवा!

अवैध बांधकामांवर खरे म्हणजे सरकारी हातोडा पडायला हवा. हा गोवा निसर्गसुंदर असल्याने पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, अशा गोव्याचे अवैध डोंगर कापणी, अवैध बांधकामे करून विद्रुपीकरण चालले आहे, हे काम रोखलेच पाहिजे.

आपले सरकारी प्रशासन जर गतीमान झाले, आणि कडक कारवाईची अंमलबजावणी झाली तर कदाचित अशी कामे रोखली जातील, अन्यथा आपल्या हातात गोवाच राहणार नाही.- सूरज गरड, सामाजिक कार्यकर्ता, तिस्क - उसगाव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com