Minor Girl Abduction Case: वार्कातील अल्पवयीन मुलीला पळावणारा संशयित वाराणसीत गजाआड

कोलवा पोलिसांनी केली कारवाई
 Varca Case
Varca CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: वार्का येथून काही दिवसांपूर्वी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवली असल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती. यावरुन पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत एका संशयिताला वाराणसी येथे अटक करण्यात आली आहे.

(Suspect who abducted minor girl from Varca arrested in Varanasi)

मिळालेल्या माहितीनुसार वार्का येथून काही दिवसांपूर्वी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवले असल्याची घटना घडली होती. यावरुन पोलिसांनी संशयित आरोपी जापी सिंग (20) याला वाराणसी येथे मुलीसह अटक केली आहे.

ही कारवाई कोलवा पोलिसांनी करत गोव्यात आणले आहे. तसेच पिढीत अल्पवयीन मुलीला तिच्या आई वडिलांकडे सुपुर्द केले आहे. यावेळी पोलिसांनी माहिती दिली आहे की, संशयिताकडून माहिती घेणे सुरु आहे. तसेच संशयितावर न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com