Sonali Phogat Case: सुखविंदर सिंग, सांगवानची कारागृहातच होणार चौकशी; कोर्टाची परवानगी

Goa Crime: 23 सप्टेंबरला म्हापसा जीएमएफसीने 14 दिवसांची अतिरिक्त न्यायालय कोठडी सुनावली आहे.
Sonali Phogat Case
Sonali Phogat CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime Case: भाजपा नेत्या सोनाली फोगट यांच्या हत्याप्रकरणातील संशयित सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांना शुक्रवारी (23 सप्टेंबर) म्हापसा जीएमएफसीने 14 दिवसांची अतिरिक्त न्यायालय कोठडी सुनावली. हे दोघे संशयित मागील 10 सप्टेंबरपासून 13 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत होते.

सीबीआयने बुधवारी (21 सप्टेंबर) म्हापसा जीएमएफसी कोर्टात अर्ज दिला होता. त्यानुसार, न्यायालयाकडून सीबीआयला संशयित सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांची कोलवाळ कारागृहातच चौकशीसाठी 20 दिवसांची परवानगी मिळाली आहे. सध्या सीबीआय अधिकारी हे सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या वेळेत त्यांची तपासाच्या दृष्टिकोनातून चौकशी करीत आहेत.

Sonali Phogat Case
Fatorda: 13 दिवस उलटले तरी बेपत्ता महिलेचा शोध नाहीच

सांगवानचे वकील अ‍ॅड. अमित जगलान म्हणाले, सीबीआयाने सुधीर सांगवान व सुखविंदर सिंगच्या चौकशीसाठी परवानगी मिळावी, यासाठी 21 सप्टेंबरला अर्ज दिला होता. आणि गुरुवारपासून न्यायालयाने चौकशीसाठी परवानगी ग्राह्य केली. मात्र, आम्हांला याची कल्पना नसल्याने आम्हांस आक्षेप घेता आले नाही. यापुढे सीबीआयाने कुठलाही अर्ज दाखल करण्यापूर्वी बचावपक्षास आगाऊ नोटीस मिळावी, अशी विनंती म्हापसा जीएमएफसीकडे केल्याचे अ‍ॅड. जगलान यांनी सांगितले.

Sonali Phogat Case
Sonali Phogat Murder Case: संशयित रामदास मांद्रेकर आणि दत्तप्रसाद गावकर यांना जामीन मंजूर

शुक्रवारी सुधीर सांगवान यांच्यामार्फत म्हापसा न्यायालयात अ‍ॅड. अमित जगलान व अ‍ॅड. अनुभव सिंग हे हजर होते. सकाळी 10.45 च्या सुमारास सीबीआय पथक हे गोवा पोलिसांसोबत संशयितांना न्यायालयात घेऊन आले होते.

सोनाली फोगट यांचा 23 ऑगस्टला मृत्यू झाला होता. या कथित खूनप्रकरणात, सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांना अटक झाली होती. घटनेच्या दिवशी दोघेही संशयित हे मयत फोगट यांच्यासोबतच होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com