Goa-Maharashtra: एकही बाटली आणू नका! गोवा मेड दारूवर पोलिसांचा कडक वॉच, थर्टी फर्स्टला जपून राहा

मद्य तस्करी करणाऱ्यावर थेट मोक्काचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.
Goa-Maharashtra
Goa-MaharashtraDainik Gomantak
Published on
Updated on

Goa-Maharashtra: नवीन वर्ष एका दिवसावर येऊन ठेपले आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण गोव्यात येत असतात. गोव्यात पार्टी, संगीत यासह धम्माल करण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची गर्दी होते. गोव्यात मद्य स्वस्त मिळत असल्याने अनेक वेळा त्याची शेजारच्या महाराष्ट्रात तस्करी केली जाते. गोव्यातून महाराष्ट्रात मद्य घेऊन जाणे कायद्याने गुन्हा आहे. महाराष्ट्र सरकारने देखील याविषयी कडक धोरण अवलंबले असून, मद्य तस्करी करणाऱ्यावर थेट मोक्काचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे गोव्यातून महाराष्ट्रात मद्याची एक बॉटल देखील घेऊन जाता येणार नाही.

Goa-Maharashtra
Sunburn: सनबर्नमध्ये भान नव्हे 'मोबाईल' हरवले; अनेक iphone चोरीला, तक्रारीसाठी पोलिस ठाण्यात झुंबड

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य सीमेवर कडक तपासणी

गोव्यातून चोरट्या मार्गाने येणाऱ्या दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर राहणार आहे. कोल्हापूर सीमेवर गवसे, कबनूर, गगनबावडा, राधानगरी, आंबा घाट तसेच, तिलारी (चंदगड) येथे तपासणी नाके कार्यरत आहेत. दोन अधिकारी, दोन जवान व पथके तैनात करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ही पथके दिवसरात्र कार्यरत राहणार आहेत. याशिवाय सिंधुदूर्ग जिल्हा सीमेवर देखील कडक तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे छुप्या मार्गाने महाराष्ट्रात दारू यायचा तुमचा मानस असेल तर, कारवाईला समोर जाण्याची तयारी ठेवा असा इशाराच महाराष्ट्र सरकारने दिला आहे.

Goa-Maharashtra
Goa Petrol-Diesel Price: कच्चे तेल 2 डॉलरने स्वस्त, तरीही इंधन दरात वाढ; गोव्यातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

महाराष्ट्रात एक बाटली आणली तरी थेट मोक्का!

दरम्यान, कोरोनानंतर महाराष्ट्र सरकारने गोव्याच्या सीमेवरील तपासणी अधिक कडक केली आहे. त्यातच महाराष्ट्रात छुप्या मार्गाने येणाऱ्या मद्याबाबत नियम अधिक कडक केले आहेत. गोव्यातून महाराष्ट्रात दारूची एक बाटली जरी आणली तरी थेट मोक्काचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी याबाबत माहिती दिली आहे. गोव्यातून येणाऱ्या दारूमुळे राज्यातील महसूलात मोठी घट होत असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com