Mahanand Naik: गोव्याचा दुपट्टा किलर 14 वर्षांनंतर आला तुरूंगातून बाहेर, पिडितेने पोलिसांकडे केली मोठी मागणी

महानंद नाईक कोलवाळ कारागृहातून बाहेर पडताच एका पिडितेने पोलिसांकडे मोठी मागणी केली आहे.
Serial Killer Mahanand Naik
Serial Killer Mahanand NaikDainik Gomantak
Published on
Updated on

Serial Killer Mahanand Naik: गोव्यात खळबळ उडवून देणारा महिलांचा कर्दनकाळ, दुपट्टा किलर महानंद नाईक 14 वर्षांनंतर प्रथमच कारागृहाबाहेर आला आहे. महानंदला कारागृह अधिकाऱ्यांनी 21 दिवसांची फरलो रजा दिली आहे.

महानंद नाईक कोलवाळ कारागृहातून आज (शुक्रवारी) बाहेर पडताच एका पिडितेने पोलिसांकडे मोठी मागणी केली आहे.

महानंद नाईकवर 16 महिलांच्या खुनाचे गुन्हे नोंद होते. त्यापैकी दोन प्रकरणांत त्याला जन्मठेपेची तर एका बलात्कार प्रकरणात शिक्षा झाली आहे. त्यानंतर तो 14 वर्षांपासून सजा भोगत आहे.

दरम्यान, त्याला 21 दिवसांची फरलो रजा मंजूर झाल्यानंतर नाईक शुक्रवारी बाहेर पडला आहे. मात्र, या प्रकरणातील एका पिडितेने पोलिसांकडे अर्ज करून संरक्षणाची मागणी केली आहे. जीवाचा धोका असल्याचे कारण सांगत या पिडितेने संरक्षणाची मागणी केली आहे.

Serial Killer Mahanand Naik
Goa Crime: दुपट्टा किलर महानंद येणार कारागृहाबाहेर; 14 वर्षांनंतर प्रथमच मोकळीक

महानंद हा गरीब महिलांना हेरून त्यांच्याशी ओळख करत होता. त्यानंतर त्या महिलेला विवाहाचे आमिष दाखवून पळून जाऊन विवाह करू, असे सांगायचा. येताना या महिलांना तो दागिने घेऊन येण्यास सांगत असे. त्यांना निर्जनस्थळी नेऊन दुपट्‍ट्याने तो गळा आवळून त्यांचा खून करत असे. अंगावरील दागिने काढून मृतदेह निर्जनस्थळी टाकून देत असे.

महानंदने फोंड्यातील एका गरीब महिलेशी संबंध ठेवले. मात्र, विवाह करण्यास नकार दिल्याने तिने फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर त्याला पोलिस कोठडीत घेतल्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील आणि उपअधीक्षक सेराफिन डायस यांनी त्याच्या कुकृत्यांची मालिकाच उघड केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com