डिचोली: अटलग्राम योजनेंतर्गत सुर्ल येथील शेतकऱ्यांना आंबा व काजू कलमांचे वाटप करण्यात आले. सुर्ल पंचायतीच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सुलक्षणा प्रमोद सावंत उपस्थितीत होत्या.
झाडे वाटपाचा कार्यक्रम करून स्वस्थ बसू नका. झाडे लावा आणि ती जगवा, असे आवाहन सुलक्षणा सावंत यांनी यावेळी केले. यावेळी अटलग्राम गोवा संस्थेचे अध्यक्ष शशिकांत गावकर यांनी संस्थेतर्फे चाललेल्या उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमांस खास उपस्थित असलेले अटलग्रामचे ज्येष्ठ अधिकारी विजय सक्सेना यांनी अटलग्राम योजनेंतर्गत मागील चार वर्षात चाललेला कामाचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा "एक पेड मॉ के नाम" हा संकल्प पुढे न्या, असे आवाहनही त्यांनी केले. सुर्लचे स्वयंपूर्ण मित्र काणेकर यांनीही मार्गदर्शन केले.
कृषी कार्यालयाचे प्रतिनिधी चंद्रकांत पावणे यांचाही अभिनंदन केले. सरपंच साईमा गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच भोला खोडगीणकर, पंच शाणू सुर्लकर, शुचिता गावकर आणि माजी सरपंच विश्रांती सुर्लकर आदींची उपस्थिती होती. अटलग्रामचे मंगलदास उसगावकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विष्णू नाटेकर यांनी केले. सुभाष फोंडेकर यांनी आभार मानले.
शेतकरी नवनाथ सुर्लकर व वसंत कालेकर यांच्या मुलांनी शिक्षण क्षेत्रात चमक दाखवल्याबाबत सुलक्षणा सावंत यांनी त्यांचे खास अभिनंदन केले. सुर्लात प्रथमच अटलग्रामतर्फे १००० आणि भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज संस्थेतर्फे ६०० आंबा आणि काजू कलमे वितरित करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.