Sadanand Shet Tanavade: राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत विचारलेल्या अतांरिकत प्रश्नाला हे वरील उत्तर देण्यात आले आहे
Sadanand TanavadeDainik Gomantak

Ayushman Bharat Yojana: गोव्यात ४१ हजार कुटुंबांना आरोग्य कवच; १७ रुग्णालये समाविष्ट

Sadanand Shet Tanavade: राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत विचारलेल्या अतांरिकत प्रश्नाला हे वरील उत्तर देण्यात आले आहे
Published on

म्हापसा: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत गोव्यात ४१,०९८ कुटुंबांना आरोग्य सेवा कवच देण्यात आले असून, यात १७ रुग्णालये समाविष्ट केली आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने दिली आहे. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत विचारलेल्या अतांरिकत प्रश्नाला हे वरील उत्तर देण्यात आले आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सद्यस्थिती विषयी खासदार तानावडे यांनी प्रश्न विचारला होता. ज्यात लाभार्थ्यांची संख्या व तपशीलांसह गोव्यातील रुग्णालये तसेच आरोग्य सुविधांसंदर्भात विचारले होते.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत निधी हा राज्य व केंद्रशासित प्रदेशांना वास्तविक आधारावर जारी केला जातो. तसेच लाभार्थ्यांकडून योजनेचा वापरावर अधीन आहे. याशिवाय कुठल्याही राज्याला विशिष्ट स्वरुपात असे वाटप केले जात नाही.

Sadanand Shet Tanavade: राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी राज्यसभेत विचारलेल्या अतांरिकत प्रश्नाला हे वरील उत्तर देण्यात आले आहे
Ayushman Bharat Yojana: मोफत उपचारांसाठी बनवा आयुष्मान कार्ड बनवा! वाचा कसा करावा अर्ज

त्यानुसार, आर्थिक वर्ष २१-२२मध्ये गोव्याला ५९.८ लाख रुपये, २०२२-२३मध्ये ५२.८ लाख रुपये व २०२३-२४ मध्ये १.१९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत २७ विविध वैशिष्ट्यांखाली जसे की कर्करोग, मधुमेह, हृदयरोग व इतर गैर-ससंर्गजन्य रोग मिळून एकूण १,९४९ प्रक्रियांशी संबंधित उपचार प्रदान करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com