Dog Shelters: 1789 लोकांवर हल्‍ले, चिमुकलीने गमावला जीव; गोव्‍यातही ‘डॉग शेल्‍टर्स’ बांधण्‍याची होतेय मागणी

Stray dog relocation india: भटक्‍या कुत्र्यांच्‍या संख्‍येवर नियंत्रण आणण्‍यासाठी उत्तर गोव्‍यात आणि दक्षिण गोव्‍यात दाेन सुसज्‍ज ‘डॉग शेल्‍टर्स’ उभारावीत अशी मागणी पुढे आली आहे.
Stray Dogs
Stray DogsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: नवी दिल्‍लीत भटक्‍या कुत्र्यांकडून लोकांवर होणाऱ्या हल्‍ल्‍याची दखल घेत सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिल्‍लीच्‍या रस्‍त्‍यांवरील सर्व कुत्र्यांना आठ दिवसांच्‍या आत ‘डॉग शेल्‍टर्स होम’मध्‍ये हलवा असा निकाल दिल्‍यानंतर गोव्‍यातही अशाचप्रकारची व्‍यवस्‍था असायला पाहिजे, ही मागणी वाढू लागली आहे. भटक्‍या कुत्र्यांच्‍या संख्‍येवर नियंत्रण आणण्‍यासाठी उत्तर गोव्‍यात आणि दक्षिण गोव्‍यात दाेन सुसज्‍ज ‘डॉग शेल्‍टर्स’ उभारावीत अशी मागणी पुढे आली आहे.

गोव्‍यात सुमारे ५६ हजार भटकी कुत्री असून त्‍यांच्‍याकडून दर दिवशी सरासरी ५७ जणांवर हल्‍ला केला जातो अशी आकडेवारी पुढे आली आहे. मागच्‍या दाेन वर्षांत कुत्र्यांनी लोकांवर हल्‍ले करून चावे घेण्‍याचे प्रकार बरेच वाढले आहेत. २०२२ साली कुत्र्यांनी लाेकांवर हल्‍ला करण्‍याची गाेव्‍यात ८०५७ प्रकरणे झाली होती. २०२३ साली हे प्रमाण ११,९०४ वर पोचले, तर २०२४ साली हे प्रमाण १७,२३६ वर पाेचले. यंदा जानेवारी महिन्‍यात १७८९ लोकांवर भटक्‍या कुत्र्यांनी हल्‍ले केले होते.

फाेंड्यात भटक्‍या कुत्र्यांनी एका लहान बालिकेवर हल्‍ला केल्‍याने तिला आपला जीव गमवावा लागला होता. फाेंड्यात विशेषत: फोंडा शहर आणि बेतोडा भागात भटक्‍या कुत्र्यांनी लोकांवर हल्‍ले करण्‍याची कित्‍येक प्रकरणे नाेंद झाली आहेत. या पार्श्वभूमीवर फोंड्यातील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले डाॅ. केतन भाटीकर यांनी सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्णयाचे स्‍वागत करताना गोव्‍यातही आता अशी व्‍यवस्‍था करण्‍याची गरज आहे, असे मत व्‍यक्‍त केले.

Stray Dogs
Stray Dog Bytes: फोंड्यात भटक्या कुत्र्यांनी 5 जणांचे घेतले चावे! लोक भयभीत; महिन्याकाठी 100 जणांवर हल्ला

‘भटक्‍या कुत्र्यांची संख्‍या नियंत्रणाबाहेर’

डाॅ. केतन भाटीकर म्‍हणाले, कुत्री सर्वांनाच आवडतात आणि त्‍यांच्‍याप्रती लाेकांमध्‍ये भूतदयाही आहे. असे जरी असले तरी भटक्‍या कुत्र्यांची संख्‍या नियंत्रणाबाहेर जात आहे. अशा कुत्र्यांसाठी जर ‘डॉग शेल्‍टर्स’ उभारले तर तिथे कुत्र्यांच्‍या पिल्‍लांचे चांगल्‍याप्रकारे पोषण करणे शक्‍य होणार आहे आणि अशी ‘डॉग शेल्‍टर्स’मधील कुत्री लोक पाळायलाही घेऊन जाऊ शकतील.

Stray Dogs
Stray Dogs In Ponda: फोंडा परिसरातील भटक्या कुत्र्यांना कुणीतरी आवरा! 48 तासांत 3 मुलांचे चावे; पालकांच्या मनात वाढती भीती

गोशाळांप्रमाणे ‘डॉक शेल्टर्स’ उभारा

दक्षिण गोव्‍यातील किनारपट्टी भागातही भटक्‍या कुत्र्यांचा हैदोस वाढल्‍याचे मागच्‍या काही दिवसांत दिसून आले होते. काही महिन्‍यांपूर्वी बाणावली आणि केळशी किनाऱ्यांवरील विदेशी पर्यटकांवर कुत्र्यांनी हल्‍ला केला होता. त्‍यानंतर केळशीचे सरपंच डिक्‍सन वाझ यांनी या प्रकरणावर वाचा फोडताना जिल्‍हाधिकाऱ्यांपर्यंत हा प्रश्न नेला होता. दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाच्‍या या आदेशाचे स्‍वागत करताना गोव्‍यात डाॅग शेल्‍टर्स सुरू करावीत अशी सूचना आपण यापूर्वीच दक्षिण गोवा जिल्‍हाधिकाऱ्यांकडे केली होती. गोव्‍यात जशा गोशाळा उभारल्‍या आहेत, त्‍याच धर्तीवर कुत्र्यांसाठी शेल्‍टर्स उभारणे गरजेचे डॉ. केतन भाटीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com