Goa Tourism: गोव्यात हूल्लडबाजांना बसणार चाप; पोलिस अधीक्षकांनी दिले कारवाईचे आदेश

2,000 हून अधिक प्रकरणे पोलिसांकडे नोंद
Calangute Beach
Calangute BeachDainik GOmantak
Published on
Updated on

गोवा सरकारने पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट करत यासाठी अडथळा ठरणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार गोवा सरकार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई म्हणून 5 ते 50,000 पर्यंत दंड ठोठावणार आहे. या पार्श्वभूमीवर आज पोलिस अधीक्षकांनी कारवाईला वेग येणार असल्याचं म्हटले आहे.

(superintendent of police Shobhit Saksena Informed Will act against touts on goa beaches )

पोलिस अधीक्षक शोभित सक्सेना यांनी आज कळंगुट, कांदोळी येथील पर्यटनस्थळांना भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत गोव्यातील पर्यटनस्थळांवर मुख्यत: किनाऱ्यांवर भिकारी, फेरीवाले तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांमुळे पर्यटकांना उपद्रव सोसावा लागत असल्याचे म्हटले आहे. त्यामूळे यापुढे अशा कृत्यांविरोधात पोलिसांच्या कारवाईला वेग येणार असल्याचं म्हटले आहे.

Calangute Beach
Goa Tourist: दर्जेदार पर्यटनासाठी साधनसुविधा आवश्‍यक

गोव्यातील किनाऱ्यांवरील माहिती देताना सक्सेना म्हणाले की, या वर्षात सुमारे 2,000 हून अधिक प्रकरणे पोलिसांकडे नोंदवली गेली आहेत. त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. यामूळे गोव्याच्या पर्यटकांमध्ये सुरक्षित आणि जबाबदार पर्यटनासाठीचा संदेश जाईल.

Calangute Beach
Goa News: रेल्वे विद्युतीकरणामुळे प्रदूषणावर आले नियंत्रण

पुढे बोलताना अधीक्षक म्हणाले की, "आमच्या कारवाईचा भर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पर्यटन, दलाली आणि फेरीवाल्यांसारख्या बेकायदेशीर कृत्यावर असणार आहे. राज्यातील पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी गोवा सरकार गांभिर्याने कृतीशील झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना बेकादेशीर कृत्ये करताना विचार करावा लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com