Konkan Railway: पावसाळ्यात सुपरफास्ट एक्सप्रेस आरक्षणासाठी अधिभार नको, रेल्वे प्रवासी समितीची मागणी; वेग मंदावत असल्याचा दावा

Konkan Railway Passenger Committee: सुपरफास्ट एक्सप्रेस साठी प्रत्येक तिकिटा मागे रेल्वे अधिभार आकारते प्रत्यक्षात मात्र या गाड्या वेगवान नसल्याचे घेतलेल्या माहितीतून उघड झाले आहे
Konkan Railway News
Konkan Railway NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तब्बल ३२ सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा वेग पावसाळ्यात कमालीचा मंदावलेला असतो. ताशी कमीतकमी ४८ ते जास्तीत जास्त ५४ किलोमीटर प्रतितास या वेगाने या रेल्वे धावत असल्याने त्यांच्या आरक्षणासाठी सुपर फास्ट वर्गवारीतून प्रवाशांकडून अधिभार आकारू नका, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीने महामंडळाकडे केली आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या वाणिज्य विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार कोणत्याही गाडीचा सरासरी वेग ५५ किलोमीटर प्रतितास पेक्षा कमी असला तर ती गाडी मेल किंवा एक्सप्रेस या वर्गवारीत गणली जावे त्या गाडीला सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणता येणार नाही. सुपरफास्ट एक्सप्रेस साठी प्रत्येक तिकिटा मागे रेल्वे अधिभार आकारते प्रत्यक्षात मात्र या गाड्या वेगवान नसल्याचे माहिती हक्क कायद्याखाली घेतलेल्या माहितीतून उघड झाले आहे असे समितीचे म्हणणे आहे.

अधिक तिकिट दर!

सुपरफास्ट एक्सप्रेससाठी तिकिटा मागे १५ ते ७५ रुपये तिकिटाच्या वर्गवारीनुसार अधिभार म्हणून जादा आकारले जातात. प्रत्यक्षात मात्र या गाड्या त्या वेगाने धावत नसल्याचे दिसून येते. याशिवाय कोकण रेल्वेने १९९३ पासून आपल्या अंतरामध्ये कागदोपत्री ४० टक्के वाढ केलेली आहे त्याचाही फटका अधिभार आकारताना प्रवाशांना बसत आहे याकडे समितीने लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com