Illegal Mining: बेकायदेशीरपणाला जणू आशीर्वादच असावा; चिरेखाणींबाबत कवठणकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Sunil Kavthankar: या पत्राच्या प्रती त्यांनी राज्याचे खाण सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि महसूल सचिव यांना पाठवल्या आहेत
Sunil Kavthankar: या पत्राच्या प्रती त्यांनी राज्याचे खाण सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि महसूल सचिव यांना पाठवल्या आहेत
Goa Pradesh Congress Committee Vice President Sunil KavthankarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बार्देश व धारबांदोडा तालुक्यातील बेकायदा चिरेखाणींवर कारवाई करा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून केली आहे. राज्यभरात अमर्यादपणे चालणाऱ्या अशा चिरेखाणींमुळे पर्यावरणाची हानी दररोज होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. या पत्राच्या प्रती त्यांनी राज्याचे खाण सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि महसूल सचिव यांना पाठवल्या आहेत.

त्यांनी पत्रात म्हटले आहे, की गोवा फाउंडेशन, विज्ञान व पर्यावरण केंद्र अशा बिगर सरकारी संस्थांनी चिरेखाणींचा बेकायदेशीपणा उघड करूनही सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. खाण खात्यासह पर्यावरण खाते, वन खाते तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचेही या बेकायदेशीरपणाकडे कमालीचे दुर्लक्ष झाले आहे. या बेकायदेशीरपणाला त्यांचा जणू आशीर्वादच असावा असे वातावरण राज्यभरात आहे.

Sunil Kavthankar: या पत्राच्या प्रती त्यांनी राज्याचे खाण सचिव, प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि महसूल सचिव यांना पाठवल्या आहेत
Illegal Hill Cutting: डोंगरकापणीविरुद्ध कारवाई करुन अहवाल सादर करा; केंद्रीय खात्याचे निर्देश

या चिरेखाणींमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षसंहार केला जात आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचेही प्रकार घडत आहेत. जमिनीची धूप आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य यासाठी या बेकायदा चिरेखाणी कारणीभूत आहेत. पर्यावरणाची न भरून येणारी हानी त्यामुळे होत आहे. बेकायदा चिरेखाणी चालत असल्याने सरकारला महसुलाला मुकावे लागते ते वेगळेच. या चिरेखाणींना पायबंद घालण्यासाठी तत्काळ व कडक कारवाईची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com