बहुउद्देशीय प्रदर्शनाला जनतेचा अल्प प्रतिसाद; सरकारकडून आयोजन

ताळगाव येथील समाज सभागृहात सुरवात; कृषी दालन उपलब्ध
multi-purpose exhibition
multi-purpose exhibitionDainik Gomantak

देशाने आत्मनिर्भर होण्यासाठी कोणती पावले टाकली आहेत, याची माहिती जनतेला मिळावी यासाठी बहुउद्देशीय प्रदर्शनाचे आयोजन सरकारने केले असले तरी गुरुवारी (ता.१४) दुसऱ्या दिवशीही मोठा प्रतिसाद या प्रदर्शनाला लाभला नाही.

ताळगाव येथील समाज सभागृहात बुधवारपासून हे प्रदर्शन सुरू झाले आहे. कृषी क्षेत्रात उत्पादन वाढीसाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना आहेत याची माहिती देणारे दालन या प्रदर्शनात थाटण्यात आले आहे.

multi-purpose exhibition
Goa Pharmacy Student: फार्मसी पदव्युत्तर विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित; विद्यार्थ्यांत निराशा

बुधवारपासून शंभरेक जणांनीच या दालनाला भेट दिल्याची नोंद तेथील नोंदवहीत गुरुवारी सायंकाळपर्यंत केल्याचे दिसून आले. त्याच्या जोडीला गोवा जैवविविधता मंडळाने निर्माण केलेल्या विविध उत्पादनांची माहिती देणारे दालन आहे.

तेथे काही उत्पादने विक्रीसाठीही उपलब्ध आहेत. दोन दिवसांत दीड हजार रुपयांच्या उत्पादनांची विक्री या दालनात झाली होती. उद्या या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.

समुद्र विज्ञान आणि भौतिक विज्ञानाची माहिती उलगडून दाखवणारे दालन प्रदर्शनात आहे. सोबत खादी ग्रामोद्योगची उत्पादने विक्री करणारेही दालन आहे. आधार कार्ड अपडेट आणि तपशिलात दुरुस्तीचे दालन आहे. त्या दालनात मात्र अनेकांची पावले थबकत होती.

multi-purpose exhibition
Knee Transplantation: गोव्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने गुडघा सांधेरोपण, असे आहेत फायदे

रो-रो सेवेची स्वयंचलित प्रतिकृती

कोकण रेल्वेने रेल्वेवरून ट्रक वाहतुकीची सोय करून दिली आहे. या रो-रो सेवेची स्वयंचलित प्रतिकृती कोकण रेल्वे महामंडळाने या प्रदर्शनात मांडली आहे. ती पाहण्यासाठी या प्रदर्शनाला भेट देणारे गर्दी करतात.

तेथे कोकण रेल्वे वाहतुकीशिवाय राबवत असलेल्या अन्य प्रकल्पांची माहिती देणारी पुस्तिकाही वितरीत करण्यात येते.

काथ्यापासून दोऱ्यांचे विणकाम

राज्यातील कृषी उपजापासून तयार विविध वस्तूंचे प्रदर्शनही एका दालनात भरवले आहे. राष्ट्रीय काथ्या मंडळाचे दालन आहे. तेथे करवंटीपासून बनवलेल्या विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर काथ्यापासून दोऱ्या विणण्याच्या यंत्राचे प्रात्यक्षिक पाहता येते.

प्रदर्शनापुरते दालन

सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड या कोळशापासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या सरकारी कंपनीचे दालन या प्रदर्शनात आहे. मात्र, तिथे कंपनीचा कर्मचारी नसून एका मुलीवर जबाबदारी सोपवली आहे. तिला या कंपनीच्या कामाविषयी काही ठाऊक नाही. कोळशापासून कंपनी वीज बनवते, असेच ती सांगते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com