Amit Palekar: जगभर प्रसिद्ध असलेला ‘सनबर्न’ हा ईडीएम फेस्टिव्हल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अगोदरच उच्च न्यायालयाने ‘सनबर्न’वर निर्बंध घातल्यामुळे आयोजकांना मोठा दणका बसला आहे.
आता आम आदमी पक्षाचे अमित पालेकर यांनी सनबर्नमध्ये भगवान महादेवाचा फोटो वापरल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाविरोधात पोलिस तक्रार करणार असल्याचे आम आदमी पक्षाचे गोवा राज्य समन्वयक ॲड. अमित पालेकर यांनी सांगितले.
पक्षाच्या कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, सनबर्नमध्ये इलेक्ट्रॉनिक्स स्क्रीनवर महादेवाचा फोटो दिसत आहे, या फोटोसमोर लोक हातात मद्याच्या बाटल्या घेऊन नाचत होते. हे कृत्य म्हणजे आमच्या देवाचा आणि सनातन धर्माचा अपमान आहे.
ते पुढे म्हणाले, सनबर्न महोत्सव हा मद्य प्रमोशन करण्यासाठी असतो. अशा ठिकाणी आमच्या देवाचा फोटो वापरून आयोजकांनी धर्माचा अवमान केला आहे. भाजप सनातन धर्माविषयी सतत बोलत असतो, परंतु या प्रकारामुळे सनातन धर्माचा अपमान नाही काय? फक्त निवडणुकीवेळी भाजपला सनातन धर्म दिसतो? असा सवाल त्यांनी केला आहे.
याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांविरुद्ध लवकरात लवकर गुन्हा नोंद करावा. तसेच पोलिस महासंचालक जसपाल सिंह यांनी या गुन्ह्याची दखल घ्यावी. ॲड. पालेकरांच्या या मागणीनंतर आधीच अनेक मुद्यांनी अडचणीत असलेल्या सनबर्न फेस्टिव्हल आयोजकांची ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी स्थिती झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.