Summer Camp : डिचोली शांतादुर्गा प्राथमिक शाळेत उन्हाळी शिबिराला उत्साहात प्रारंभ

Summer Camp : याप्रसंगी साधनसुविधा विभागाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर, पालक शिक्षक संघाचे केदार शिरगावकर, शिक्षिका प्रमुख सुविद्या गणपुले, चित्रकला शिक्षक शैलेश चणेकर आदी उपस्थित होते.
Summer Camp
Summer Camp Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Summer Camp :

डिचोली, विद्यावर्धक मंडळ संचलीत श्री शांतादुर्गा प्राथमिक शाळेत सोमवारपासून (ता.१५) उन्हाळी शिबिराला उत्साहात प्रारंभ झाला आहे.

विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी साधनसुविधा विभागाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर, पालक शिक्षक संघाचे केदार शिरगावकर, शिक्षिका प्रमुख सुविद्या गणपुले, चित्रकला शिक्षक शैलेश चणेकर आदी उपस्थित होते.

मुलांची आवड ओळखून त्या क्षेत्रात पुढे येण्यासाठी पालकांनी त्यांना लहानपणापासूनच प्रोत्साहन द्यावे. शिबिराच्या माध्यमातून मुलांचे कलागुण विकसित होण्यास मदत होते. असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

Summer Camp
Goa News : गोव्याची ओळख गुन्ह्यांची राजधानी ! कॅ. विरियातो फर्नांडिस

विविध विषयांवर मार्गदर्शन

७ ते ९ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले असून, येत्या सोमवारपर्यंत (ता.२२) हे शिबीर चालणार आहे.

या शिबिरात योग, प्राणायम, चित्रकला, हस्तकला, श्लोक, स्रोत पाठांतर, कथाकथन, हस्ताक्षर आणि खेळ या विषयांवर तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने सौ. सुविद्या गणपुले यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com