Suleman Khan: सुलेमान खान प्रकरणात अमित पालेकरांना समन्स! पुन्हा होणार चौकशी

Amit Palekar Inquiry: सुलेमान खान याने त्याच्या पलायनात मदत करणाऱ्या पोलिसांची नावे उघड करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ त्याने त्यावेळी ॲड. अमित पालेकर यांच्याकडे पाठवला होता.
Suleman Khan Case Updates
Amit PalekarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जमीन हडपप्रकरणातील संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमानने कोठडीतून पलायन केल्याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामधील चौकशीसाठी ॲड. अमित पालेकर यांना ‘बीएनएस’च्या कलम ३५(३) खाली आज समन्स बजावून उद्या शुक्रवारी २१ रोजी सकाळी ११ वा. चौकशीस उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

त्यांना बजावण्यात आलेल्या समन्समध्ये सुलेमानविरुद्ध दाखल गुन्ह्यासंदर्भात काही निर्देशांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, जुने गोवे पोलिसांनी कोठडीतील पलायनप्रकरणी संशयित सुलेमानसह तिघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

कोठडीतून पलायन केल्यानंतर संशयित सुलेमान खान याने त्याच्या पलायनात मदत करणाऱ्या पोलिसांची नावे उघड करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ त्याने त्यावेळी ॲड. अमित पालेकर यांच्याकडे पाठवला होता.

Suleman Khan Case Updates
Suleman Khan: सुलेमानने कारागृहातून संभाषण केलेल्या 'मोबाईल'ची तपासणी; तथ्यहीन विधाने केल्याचे पोलिस अधीक्षकांचे स्पष्टीकरण

त्यामुळे जुने गोवे पोलिसांनी सुलेमान खान याला अटक झाल्यानंतर पहिले समन्स पाठवून चौकशी केली व जबानीही नोंदवून घेतली होती. सुलेमान याला अटक करण्यापूर्वी दुसरा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता व त्यामध्ये त्याने ॲड. पालेकर यांच्या सांगण्यावरून पहिल्या व्हिडिओत पोलिसांवर आरोप केल्याचे म्हटले होते. त्यावेळी ॲड. पालेकर यांनी हा व्हिडिओ पोलिसांनी सुलेमान याला धमकी देऊन काढण्यास लावल्याचे उघड झाले होते.

दरम्यान, जुने गोवे पोलिसांनी संशयित सुलेमान खान याच्यासह बडतर्फ कॉन्स्टेबल अमित नाईक व हजरत अली या तिघांविरुद्ध आरोपपत्र गेल्या आठवड्यात न्यायालयात दाखल केले आहे. त्यावरील सुनावणी २५ रोजी ठेवली आहे. तेव्हाच त्याला न्यायालयीन कोठडी वाढवण्यास हजर केले जाईल.

Suleman Khan Case Updates
Suleman Khan: '..तुम्ही सुलेमानलाच विचारा! माझा त्या व्यक्तीशी संबंध नाही', आरोपांवर उपसभापती डिसोझा यांचे स्पष्टीकरण

रामा काणकोणकर विरुद्ध गुन्हा

आझाद मैदानावर सरकारच्या कार्यपद्धतीसंदर्भात पत्रकारांना संबोधित करताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विरोधात द्वेष, अपमानास्पद व धमकीदायक विधाने केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी समाज कार्यकर्ता रामा काणकोणकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला समन्स बजावून आज चौकशी करून जबानी नोंदवण्यात आल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली.

काल संध्याकाळी रामा काणकोणकर यांच्यासह आणखी काही समाज कार्यकर्त्यांनी सांकवाळ पंचायतीमधील कथित घोटाळा व भ्रष्टाचारप्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com