विजय यांच्या या ‘संडे डायलॉग’ना आता भाजपकडून काही उत्तर असेल का?

सरकारी अधिकाऱ्यांना स्वतःच्या कार्यालयात बोलावून लोकांच्या समस्या तिथल्या तिथे सोडविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जातो.
Vijay Sardesai News | Fatorda constituency News
Vijay Sardesai News | Fatorda constituency NewsDainik Gomantak
Published on
Updated on

विजय सरदेसाईंचे ‘डायलॉग’

आपल्या मतदारसंघातील मतदारांबरोबर सतत संपर्क ठेवणारे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल रविवारपासून पुन्हा एकदा आपला ‘संडे डायलॉग’ हा संवादाचा उपक्रम सुरू केला आहे. सरकारी अधिकाऱ्यांना स्वतःच्या कार्यालयात बोलावून लोकांच्या समस्या तिथल्या तिथे सोडविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जातो. विजयच्या मागच्या कार्यकाळात त्यांना याच उपक्रमाने मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यावेळी विजय सत्ताधारी गटात होते. मात्र, यावेळी ते विरोधी गटात असल्याने सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळणार की नाही याबद्दल साशंकता व्यक्त केली जात होती. पण कालच्या त्यांच्या या उपक्रमाला सरकारी अधिकाऱ्यांनी बऱ्यापैकी उपस्थिती लावली. त्यामुळे विजय यांचे सरकारी अधिकाऱ्यांबरोबरही ‘डायलॉग’ चांगले आहेत हे सिद्ध झाले. विजय यांच्या या ‘संडे डायलॉग’ना आता भाजपकडून काही उत्तर असेल का? ∙∙∙

(Vijay's 'Sunday Dialogue' Communication initiative)

Vijay Sardesai News | Fatorda constituency News
बुस्टर डोस न घेतलेल्या दोघांचा कोरोनामुळे मृत्यू

खाण अवलंबित संभ्रमातच

केंद्र आणि राज्य सरकारला भरभक्कम आर्थिक निधी उपलब्ध करून देणारा राज्यातील खाण उद्योग सध्या मरणासन्न अवस्थेत आहे. खाणी बंद झाल्यानंतर अजूनपर्यंत त्या कायदेशीर मार्गाने सुरू झालेल्या नाहीत. राजकारणी फक्त निवडणुका जवळ आल्या की यंव करू आणि त्यंव करू असे सांगून मतदारांची बोळवण करतात, पण अजून काही ठोस असे निष्पन्न झालेले नाही. खाणी सुरू करण्यासाठी सुरवातीला खाण महामंडळ स्थापन करण्याची घोषणा झाली, त्यानंतर आता पुन्हा खाणींचा लिलाव करण्यात येईल, असे सांगितले जाते, काय खरे आणि काय खोटे..! एक मात्र खरे, आता लोकसभा निवडणूक जवळ येत चालली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा खाण अवलंबितांना उल्लू बनवण्यासाठी सत्ताधारी काहीतरी फंडा निश्‍चितच शोधून काढतील... खाण अवलंबितच बोलत आहेत हे! ∙∙∙

टॅक्सीवाल्यांना कोण तारणार

अखेर उच्च न्यायालयाने नाक दाबले व टॅक्सीवाल्यांना निरूपायाने डिजिटल मीटर बसविणे भाग पडले आहे. तरीपण अनेकजण अजूनही मीटरांना टाळाटाळ करत असून त्यांचे परवाने रद्द केले जातील तसेच त्यांच्या या अडवणुकीला पर्याय म्हणून ‘ओला-उबर’ला परवानगी देण्यासंदर्भात सरकार विचार करत असल्याचे संकेत वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिले आहेत. वास्तविक सरकारने या मीटरसाठी टॅक्सीना गरजेहून अधिक वेळ दिला होता, तरीही त्यांची टाळाटाळ सुरू होती. कारण चर्चिल, मायकल लोबो सारखे सतत त्यांची बाजू घेत असत व सरकार नंतर पडते घेत असे, पण आता पाणी गळ्यापर्यंत पोचले, तिकडे इरमांवना लोकांनी घरी बसवले, तर मायकल विरोधी पक्षात गेल्याने त्यांना कोणी विचारीनासे झाले. त्यामुळे आता ‘ओला उबर’विरुध्द टॅक्सीवाले रस्त्यावर आले तरी त्यांचे काही चालण्याची शक्यता उरलेली नाही. ∙∙∙

Vijay Sardesai News | Fatorda constituency News
हातमाग कामगारांचे प्रश्न सरकार दरबारी मांडणार - आमदार प्रवीण आर्लेकर

पर्यटनासाठी वाहतूक सुविधा आवश्‍यक

पर्यटन क्षेत्रात गोव्याची थेट स्पर्धा थायलंड, इंडोनेशिया, मालदीव, केरळ यांच्याशी आहे. या पर्यटनन स्थळांवर एक गोष्ट समान आहे, ज्याची उणीव अजूनही राज्य सरकारने भरून काढलेली नाही. प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत येथे सार्वजनिक वाहतूक सुविधा नाही. राज्यात येणाऱ्या देशी आणि विदेशी पर्यटक, तसेच स्थानिकांकडून अनेक वर्षांपासून तक्रारी दिल्या जात आहेत, तरी देखील काहीही झालेले नाही. आता सरकार ओला आणि उबर आणण्याचा विचार करत आहे. पर्यटन क्षेत्रात गोव्याला टिकून राहायचे असेल, तर सार्वजनिक वाहतूक सुविधा महत्त्वाचा घटक आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. ∙∙∙

कायद्याचे उल्लंघन

राज्यात येणारे पर्यटक हे भाडेपट्टीवर चारचाकी आणि दुचाकी घेऊन फिरतात, परंतु पर्यटक कायद्याचे उल्लंघन करून बेशिस्तपणे वाहन चालवत असल्याने अपघात होत आहेत. हल्लीच एका पर्यटकाने एसयूव्ही घेऊन समुद्रकिनाऱ्यावर गेल्याने ती खडकावर अकडली होती, तर आसगाव येथे नदीच्या फाट्यात पर्यटकांनी भाडेपट्टीवर घेतलेली एसयूव्ही पडली. कोणीही येऊन गोव्यात आपल्या मरजीनुसार वागतात, परंतु स्थानिक प्रशासनांकडून कारवाई केली जात नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. त्यातच केंद्रीयमंत्री किरेन रिज्जिजू यांनी देखील ट्विट करून पर्यटकांना नियमांचे उल्लंघन न करण्याचे आवाहन केले. मात्र, स्थानिक प्रशासन केव्हा जागे होणार, असा प्रश्‍न लोक विचारत आहे. ∙∙∙

काँग्रेस सक्रिय

विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागून विरोधी पक्षात बसलेली काँग्रेस आता हळूहळू सक्रिय होताना दिसत आहे. अर्थात याला कारण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले गिरीश चोडणकर यांना द्यावे लागेल. कारण यापूर्वी चोडणकर यांनी घेतलेले विषय गंभीर होते आणि त्याचा परिणाम सत्ताधाऱ्‍यांना भोगावा लागला. आता त्यांनी घेतलेले विषयही तितकेच गंभीर आहेत. कारण चोडणकर यांनी घेतलेले विषय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना सक्रिय व्हावे लागत आहे. पाटकरही आता समाज माध्यमांचा वापर करून सक्रिय होताना दिसत आहेत. काही का असेना काँग्रेस सक्रिय होत आहे हे महत्वाचे आहे, तर सत्ताधारी गटाने विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना विविध विषयांमध्ये अडकवून जेरबंद केले आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com