Sanjivani Sugar Factory: ‘संजीवनी’ कारखान्याची ऊस तोडणी सुरू

Sanjivani Sugar Factory: 500 मजूर दाखल: गतवर्षीप्रमाणेच मिळणार उसाला दर
Sanjivani Sugar Factory
Sanjivani Sugar FactoryDainik Gomantak
Published on
Updated on

Sanjivani Sugar Factory: संजीवनी सहकारी साखर कारखान्याची ऊस तोडणी सुरू करण्यात आली आहे. वेज स्टार ॲग्रो वेज कंपनीतर्फे गोवा राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी करणार आहे. ऊस तोडणीसाठी एकूण 500 ऊसतोड मजूर आणलेले असून सुरवातीला संजीवनीतील ऊस तोडणी सुरु केली आहे.

Sanjivani Sugar Factory
Margao: पायाक्षेत्र शुल्क वाढविण्यास विरोध

खानापूर येथील ऊस कारखान्यात हा तोडलेला ऊस नेणार आहे. गेल्या वर्षी जसा टनाला दर दिला आहे, त्याच दरानुसार संबंधित कंत्राटदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर देणार आहे. ऊस तोडणी केलेल्या शेतकऱ्यांना रक्कमही लगेच देणार असल्याचे प्रशासक सत्तेज कामत यांनी सांगितले.

संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या 2 लाख चौ. मी. जमिनीत ट्र्क टर्मिनस होणार आहे. या संदर्भात सर्वे चालू आहे. येत्या दोन तीन महिन्यात ट्र्क टर्मिनस होणार आहे, त्यामुळे विविध ठिकाणी रस्त्यावर पार्कींग करणाऱ्या अवजड वाहनांना त्याचा उपयोग होणार आहे. या पार्कींग मुळे साखर कारखान्याच्या तिजोरीतही मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे.

कमीत कमी दिवसाला 50 हजार ते एक लाख रुपये या पार्कींग मुळे मिळणार असल्याचे प्रशासक सत्तेज कामत यांनी सांगितले.

79 कंत्राटी कामगार कामावर रूजू

संजीवनी सहकारी साखर कारखान्यात कंत्राट पध्दतीवर असलेल्या 79 कामगारांचे येत्या जुलैपर्यंत संबंधित खात्याने कंत्राट नूतनीकरण केलेले आहे. त्यानुसार या महिन्यापासून ते रितसर कामावर रुजू झाले आहेत.सर्व कामगार संजीवनीच्या जमिनीत विविध लागवडीसाठी मग्न आहेत. या कामगारांचे वेगवेगळे गट आम्ही तयार करून त्यांनी केलेल्या विविध पिकांच्या उत्पन्नावर 10 टक्के आर्थिक रक्कम त्यांना देण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com