योगेश मिराशी
Mental Health: अलीकडच्या काळातील बदलती जीवनशैली तसेच ताणतणावामुळे नैराश्याला सामोरे जावे लागते. परिणामी मनामध्ये आत्महत्येचा विचार येतो. शिवाय दररोज वर्तमानपत्रांत मानसिक आजारांनी ग्रासलेल्या व्यक्तीने आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. त्यामुळे आणखी नकारात्मक विचार मनात येतात.
मानसिक आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘टेलिमानस हेल्पलाईन’ लाभदायी ठरते. याच माध्यमातून झालेल्या संवादामुळे अनेकांच्या आयुष्याची दिशा बदलली आहे.
मानसिक, आर्थिक, प्रेमभंग, कौटुंबिक वाद, कामामधील ताणतणावामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच मानसिक आजारांशी झगडणाऱ्या रुग्णांचे टेलिमानस 14416 या हेल्पलाईनच्या माध्यमातून समुपदेशन केले जातात.
आत्महत्येच्या विचाराने ग्रासलेले आहेत, अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यांना मानसिक व भावनिक आधार देणे तसेच त्यांच्याशी मैत्रीचे नाते प्रस्थापित करणे हा उद्देश असतो.
तणाव व नैराश्यातून आत्महत्येचा विचार करत असलेली व्यक्ती आमच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधतात. बोलल्याने त्यांचे मन मोकळे होते व ती सकारात्मक विचार करायला सुरूवात करतात. शिवाय तणाव व्यवस्थापनचा तंत्र टेलिमानसद्वारे दिला जातो. वेळोवेळी रुग्णांचा पाठपुराठा करून त्यांना योग्य मागदर्शन दिले जाते. ही सेवा गोपनीय असतात, असे डॉ. स्नेहा पोकळे यांनी सांगितले.
हताशपणा, मी कोणत्याच कामाचा नाही, असाहाय्यता, दररोजच्या क्रियाकलापांमध्ये रस कमी होणे, मनःस्थिती खराब होणे, झोपेचा त्रास, चिडचिडपणा, भूक कमी होणे व पदार्थांच्या वापराचे विकार वाढणे हे प्रकार मानसिक आजारांची काही लक्षणे आहेत.
तसेच, नैराश्य व एकाकीपणा ही आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत. विविध कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढते. विविध कारणांमुळे आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तींना सकारात्मकदृष्टी देण्याचे काम टेलिमानसद्वारे करण्याचा प्रयत्न केला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.