Goa Politics: कर्मचारी भरती आमदारांच्या शिफारशी, हाच मोठा घोटाळा!

Goa Politics: भाजप श्रेष्ठींनी मागवला अहवाल : ...म्हणून लांबवला परीक्षेचा निकाल
Goa Assembly
Goa AssemblyDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंता व तांत्रिक साहाय्यक पदांसाठी आमदारांनी लेखी पत्राच्या स्वरूपात शिफारशी केल्या होत्या.

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या कार्यालयात त्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या होत्या. त्यामुळे आमदारांच्या शिफारशीनुसार उमेदवारांची निवड कऱण्यासाठी लेखी परीक्षेचा निकाल लांबवण्यात आला होता, असा आरोप केला जात आहे.

Goa Assembly
Fish Factories: मासळी कारखानेच प्रदूषणकारी !

या पदांसाठी आमदारांकडून शिफारस पत्रे स्वीकारूनच या भरती प्रक्रियेत मेहेरनजर दाखवण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगण्यात येते.

या प्रकरणाची दखल भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने याआधीच घेतली असली तरी याबाबतचा सविस्तर अहवाल स्थानिक भाजप नेत्याकडून पक्षश्रेष्ठींनी आज (मंगळवारी) मागवून घेतला आहे.

Goa Assembly
Marina Project: मरिना प्रकल्पावरून गदारोळ

या भरतीविषयी आमदारांकडून संशय व्‍यक्त केला जाणे आणि त्या खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांचा राजीनामा घेणे, या दोन्ही गोष्टी एकाचवेळी घडल्याने समाजमनात भाजपविषयी कोणती प्रतिमा निर्माण झाली असेल, याचा अंदाज भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडून घेण्यात येत आहे.

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीपूर्वी दीपक पाऊसकर हे साबांखा मंत्री असताना ही कर्मचारी भरती वादात सापडली होती.

त्याचा राज्यभर गवगवा झाला. त्यामुळे केंद्रात 2024 पासून व राज्यात २०१२ पासून सत्ता असूनही २०१७ च्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणे कठीण झाले होते.

त्यामुळे आताच्या या चर्चेचा विशेषतः दक्षिण गोव्यात किती फटका बसू शकतो, याचा अंदाज घेण्यात येत आहे.

‘त्या’ आमदारांची कोंडी

बहुतांश आमदारांनी या पदांसाठी शिफारशी केल्या होत्या. त्यांनी उमेदवारांची नावे सुचवताना प्राधान्यक्रम ठरवून दिला होता. मात्र, विचार करताना तळातील एक-दोन जणांचाच निवडीसाठी विचार झाल्याने आमदार वैतागले आहेत.

त्यांच्या निकटवर्तीयांची कामे न होता मतदारसंघातील इतरांची कामे करण्याचा प्रकार यावेळी घडल्याने त्यांची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झाली आहे.

आमच्या उत्तरपत्रिका दाखवा

कनिष्ठ अभियंता व तांत्रिक साहाय्यक पदासाठी २०१७ पूर्वी घेतलेल्या लेखी परीक्षेत अनेकांना चांगले गुण मिळाले होते. तशीच परीक्षा आता घेऊनही त्यांना म्हणावे तसे गुण मिळालेले नाहीत. त्यामुळे काही उमेदवारांनी आता आपल्या गुणांची फेरतपासणी करावी, तसेच आम्ही दिलेली उत्तरपत्रिका दाखवा, अशी मागणी केली आहे.

येत्या आठवडभरात त्यासाठी अनेक उमेदवार पुढे येतील, अशी माहिती मिळाली आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागे असलेल्यांना या परीक्षेत आपल्यापेक्षा जास्त गुण कसे मिळाले, असा आक्षेप काहींनी घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com