Goa Politics: मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ; ढवळीकरांनी स्पष्ट केले युतीचे गणित

Sudin Dhavlikar: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या विधानावर मत व्यक्त केलं आहे
cabinet reshuffle Goa
cabinet reshuffle GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील राजकीय पक्षांबद्दल सध्या युतीला धरून आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक चर्चा सुरु आहेत. अलीकडेच राज्यचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळात होऊ शकणाऱ्या फेरबदलांबद्दल काही संकेत दिले होते आणि युतीबद्दल देखील मुख्यमंत्र्यांनी रोखठोक विधान केले आहे आणि यानंतर अनेक प्रकारच्या कुजबूजींना उधाण आलं. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या विधानावर मत व्यक्त केलं आहे.

सुदिन ढवळीकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांना पक्षातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशाप्रकारे विधान करणं भाग ठरतं. सध्या देशात तसेच राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्ता चालवली जातेय. गोव्यात दोन पक्षांमध्ये युती होण्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाचा वाटा होता. या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतल्यानेच गोव्यात युती शक्य झाली.

cabinet reshuffle Goa
Goa Politics: गोवा मुक्त झाल्यावर ‘गोंयकार’ पूर्णतया भारतीय झाले की नाही? विशेष लेख

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या अनेक गोष्टी आजतागायत कोणीही केलेल्या नाहीत. आजच्या घडीला हिंदूंनी एकत्र येऊन पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वांतर्गत काम करण्याची गरज आहे. बाई कोणामध्ये काय बोलणं झालंय हे माहिती नाही पण पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि फडणवीस जे सांगितली तसाच निर्णय घेतला जाईल अशी माहिती ढवळीकरांनी दिलीये.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या महामेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विशेष हजेरी लावली होती, यावेळी त्यांनी आगामी मतदानावर काही रोखठोक वक्तव्य केलं आहे. प्रियोळ मतदारसंघ हा कायम भारतीय जनता पक्षाचाच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून डबल इंजिनचं सरकारच कायम राहील असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. ज्या आमदारांना भारतीय जनता पक्षातर्फे मतदानात सामील व्हायचं नसेल त्यांनी आताच याबद्दल माहिती द्यावी असं थेट विधान केल्यानं सध्या हा मुद्दा चर्चेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com