कुंडईत हरित ऊर्जा प्रकल्प साकारणार : सुदिन ढवळीकर

श्रीकृष्ण मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यात मान्यवरांचा सत्कार
Sudin Dhavalikar
Sudin Dhavalikar Dainik Gomantak

हरित ऊर्जा प्रकल्पातून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याचा आपला मानस असून कुंडईवासीयांच्या सहकार्याने हा हरित ऊर्जा प्रकल्प साकारला जाईल, असे उद्‍गार वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले.

Sudin Dhavalikar
Smart City Accident : आणखी एक ट्रक रस्त्यात रूतला; 'स्मार्ट सिटी'मुळे वाहनचालकांचा कोंडमारा; फोटो पहा

वाडीवाडा - कुंडई येथील श्रीकृष्ण मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात ढवळीकर बोलत होते. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, ह्रषिकेश हरिद्वार येथील अद्वैतानंद स्वामी, इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष ॲड. मनोहर आडपईकर, कुंडईचे सरपंच सर्वेश गावडे, उपसरपंच उज्वला नाईक, उद्योजक शाम महानंदू नाईक, श्रीकृष्ण मंदिराचे अध्यक्ष गोपी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीपाद नाईक म्हणाले, कुंडई गावातील एकजूट महत्त्वाची असून कमी वेळेत मंदिर उभारून ग्रामस्थांनी एक आदर्श निर्माण केला आाहे. स्वामी अद्वैतानंद यांनी श्रीकृष्णाच्या गीतेचे महत्त्व सांगितले. मनोहर आडपईकर, सर्वेश गावडे, शाम नाईक यांनीही आपले विचार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com