गोव्यात वीज खात्याला येणार का सु‘दिन’?

खात्याविषयी अनेक तक्रारी प्रलंबित; अखंडित वीज पुरवठ्याचे आव्हान
Sudin Dhavalikar
Sudin Dhavalikar Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : मगोपचे नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांना वीज खाते दिल्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. खात्याच्या प्रलंबित समस्या सोडवण्याबरोबरच राज्यात 24 तास अखंडित वीजपुरवठा करण्याचेही नव्या मंत्र्यांपुढे आव्हान आहे.

Sudin Dhavalikar
व्याघ्र क्षेत्र प्रस्तावाला मान्यता देणार नाही; विश्वजित राणे

वीज खाते हे तसे महत्त्वाचे खाते. वैयक्तिक दृष्ट्या तसेच व्यावसायिक दृष्ट्या या खात्याशी बांधील असणारे अनेक ग्राहक सापडतील. पण एवढे होऊनही कार्यक्षमतेच्या बाबतीत या खात्याला अव्वल गुण देता येत नाही. मागच्या सरकारात (Goa Government) हे खाते नीलेश काब्राल यांच्याकडे होते, पण तरीही या खात्याबाबत अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे वारंवार खंडित होणारी वीज सेवा सुरळीत आणि अखंडित पुरवण्याचे कार्य ढवळीकर यांना करावे लागणार आहे.

फोंडासारख्या (Ponda) मोठ्या शहरातही अनेकदा वीजप्रवाह खंडित होताना दिसतो. काल मध्यरात्री फोंड्याच्या बाजारपरिसरात अशीच वीज खंडित झाली होती. आणि तक्रार केल्यास एक तासानंतर वीजप्रवाह सुरू होईल, असे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. उन्हाळ्यामुळे अंगाची लाहीलाही होत असताना वीज पुरवठा खंडित होणे म्हणजे ‘आगीशी खेळ’असते, हे या वीजखात्यातील कर्मचाऱ्यांच्या गावीच नसते. त्यामुळे कामचुकारपणा हा या खात्याला ग्रासलेला मोठा रोगच म्हणावा लागेल. बऱ्याचदा तक्रारीला प्रतिसाद देण्यास हे कामगार टाळाटाळ करतात. त्याचबरोबर विजेचा दाब वाढून उपकरणे निकामी होणे, असे प्रकारही घडतात. त्यामुळे चूक वीजखात्याची अन् भूर्दंड मात्र ग्राहकांना असा प्रकार होतो.

Sudin Dhavalikar
कंपनीचा निष्काळजीपणा मुक्या प्राण्यांच्या जीवावर

पावसाळ्यात तर विजेचा दाब वाढणे म्हणजे ‘नेमेचो येतो पावसाळा’ असे ठरल्यासारखे. वीजमंत्र्यानी नवीन वीज (Electricity) जोडणी करिता टाळाटाळ करू नका, असे कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे. पण बऱ्याचवेळा ही टाळाटाळ करण्याच्या मागे आर्थिक कारण असते, असे अनेक ग्राहकांचे मत आहे. खासकरून व्यावसायिक आस्थापनांबाबत याचा जास्त अनुभव येतो. आता आणखी काही दिवसानंतर पावसाळा सुरू होणार आहे. त्यावेळी वीज खात्याला युध्दपातळीवर काम करावे लागते. आणि त्या दिवसात त्यांची खरी कसोटी असते. पण बऱ्याचदा हे कामगार व अभियंते या कसोटीला उतरलेले दिसत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com