स्वार्थासाठीच ढवळीकरांची ‘आप’शी सोयरीक

मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी आतापर्यंत केवळ स्वतःच्या स्वार्थासाठीच भाजप आणि काँग्रेससोबत युती केली.
गोवा 'आप'
गोवा 'आप'Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांनी आतापर्यंत केवळ स्वतःच्या स्वार्थासाठीच भाजप आणि काँग्रेससोबत युती केली. आताही दिल्लीतील कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही असे जाहीर करूनही आम आदमी पक्षासोबत सोयरीक जुळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा आरोप फोंडा भाजप मंडळाने पत्रकार परिषद घेऊन केला. यावेळी अध्यक्ष विश्‍वनाथ दळवी, उपनगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, नगरसेवक रितेश नाईक, मोर्तू गावडे व शुभम नार्वेकर उपस्थित होते. (Sudin Dhavalikar is trying to form an alliance with Aam Aadmi Party)

ढवळीकर यांनी सुरूवातीला काँग्रेस व त्यानंतर भाजपशी केवळ सत्तेच्‍या लालसेपोटी युती केली. येत्या निवडणुकीसाठी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आदी पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न त्‍यांनी केला, पण कोणी भीक घातली नाही. त्‍यामुळे आता ते ‘आप’शी युती करण्यासाठी धडपडत आहेत. ढवळीकर यांच्याकडून अरविंद केजरीवाल यांचे गुणगान केले जात आहे. हे सगळे राजकीय स्वार्थासाठी चालल्याचा आरोप विश्‍वनाथ दळवी यांनी केला. कोरोना काळात दिल्लीत लोक ऑक्सिजनअभावी कसे प्राणाला मुकले हे सर्वांना माहीत आहे. तेथे आरोग्यसेवेची पुरती वाट लावणाऱ्या ‘आप’ला गोमंतकीय ओळखून आहेत.

गोवा 'आप'
Goa: विकासासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक- श्रीपाद नाईक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामुळे दिल्लीतील कोविड स्थिती नियंत्रणात आली असल्याचे सांगून गोव्यात कोविड काळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही गोमतकीयांना दिलासा दिला, त्यामुळेच राज्‍यातील कोरोनाची स्‍थिती आटोक्‍यात येण्‍यास मदत झाली, असा दावा दळवी यांनी केला. गोव्याच्या विकासासाठी प्रादेशिक पक्षच आवश्‍यक असल्याचे सांगणाऱ्या सुदिन ढवळीकर यांना आता दिल्लीतील आम आदमी पक्ष कशासाठी हवा आहे, असा सवाल करून मगो पक्ष दुतोंडी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

गोवा 'आप'
Goa Politics: दिल्लीचा विकास गोमंतकीयांनी पहावा

ढवळीकरांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये : रितेश

ऑनलाईन शिक्षणपद्धतीचा मुद्दा उपस्थित करताना रितेश नाईक यांनी सांगितले की, सुदिन ढवळीकर यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये. ज्या मोबाईल टॉवरची मागणी ढवळीकर यांच्याकडून केली जातेय, त्या टॉवरची उभारणी मडकईत करण्यासाठी त्‍यांनी काय कार्यवाही केली, असा सवाल नाईक यांनी केला. मुख्यमंत्री सावंत यांनी दहावीची परीक्षा नियोजबद्धरीत्या घेतली. त्यामुळे एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाला नाही. आताही ऑनलाईन शिक्षणासाठी सरकारने शिक्षकांसाठी पूर्वमुद्रित शिकवणी योजना तयार केलेली आहे. त्याचा लाभ मुलांना कधीही आणि कुठेही होऊ शकतो, असेही नाईक म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्‍यात पुन्‍हा भाजपचेच सरकार सत्तेवर येईल, असा दावाही भाजप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com