Sudin Dhavalikar : सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक रहावे!

भूमाफियांच्या दबावाला बळी पडू नका
Sudin Dhavalikar
Sudin Dhavalikar Dainik Gomantak

फोंडा : सरकारी सेवेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने निर्धास्तपणे काम करताना कोणत्याही दबावाखाली येऊ नये, असे आवाहन करताना भूमाफियांच्या दबावाला बळी पडून ज्याप्रमाणे काही सरकारी कर्मचारी अडकले, तसे काम मात्र करू नका, सेवेशी प्रामाणिक रहा, असे आवाहन मगो पक्षाचे नेते तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

कुर्टी - फोंड्यातील क्रीडा संकुलावर अंत्रुज पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या फोंडा व धारबांदोडा तालुका पातळीवरील सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर सुदिन ढवळीकर बोलत होते.

व्यासपीठावर मगो नेते डॉ. केतन भाटीकर, कुर्टी - खांडेपारचे सरपंच नावेद तहसीलदार, फोंड्याचे मामलेदार विमोद दलाल, गोवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश नाईक तसेच हरीष पार्सेकर, फोंडा पालिकेचे नगरसेवक शांताराम कोलवेकर व अंत्रुज पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेश गावणेकर आदी उपस्थित होते.

Sudin Dhavalikar
Mahadayi Water Dispute: ‘आरजी’चा खरा चेहरा समोर!

ढवळीकर म्हणाले, सरकारी सेवेशी प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रामाणिक राहिले पाहिजे. आज कारकून असलेला पुढे बढती मिळून साहेब होऊ शकतो, त्यासाठी सचोटी महत्त्वाची असते. लोकांची कामे योग्यरीतीने केली तर लोकच तुम्हाला चांगले असल्याची पावती देतात. मात्र काही भूमाफियांच्या हव्यासापोटी बरेच जण बळी गेले आहेत.

आपल्या मतदारसंघातही असे काही कर्मचारी बळी पडले असून पश्‍चाताप करण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. भूमाफियांनी लोकांच्या जमिनी गिळंकृत करताना अनेकांना अडकवले आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे, कुणाच्या दबावाखाली येऊन कोणतेही काम करू नये.

...कर्नाटक हिरावू शकत नाही!

म्हादईचा विषय हा फार पूर्वीचा असून मगो पक्षाने म्हादई बचाव अभियान उभारले, त्यावेळेला गोमंतकीयांनी अपेक्षित सहकार्य केले नाही. शंखनाद करून हे आंदोलन पुकारण्यात आले होते, त्यासाठी उस्ते ते ओपा - खांडेपार अशी जलयात्रा काढण्यात आली, मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने हे आंदोलन पुढे जाऊ शकले नाही, असे सांगून म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे, तिला कर्नाटक हिरावू शकत नाही, सरकार त्यासाठी प्रामाणिकपणे लढा देत असल्याची ग्वाहीही ढवळीकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com