Sudin Dhavalikar : गणेशचतुर्थीला अवघा एक आठवडा शिल्लक असून लोकांची गैरसोय होणार नाही यासाठी विद्युत खात्याने कंबर कसली आहे. खात्याने पथदीप दुरुस्ती किंवा नवीन बसवण्यासाठी सुमारे दहा हजार फिटींग सामान आणले आहे. सध्या हे काम 70 टक्क्यांपर्यंत झाले आहे आणि उर्वरीत 30 टक्के 25 ऑगस्टपर्यंत होईल, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. पर्वरीतील मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
गोव्यातील चतुर्थी, दिवाळी आणि ख्रिसमस हे मुख्य सण असल्याने त्या काळात विद्युत आणि सार्वजनिक बांधकाम खात्यावर कामाचा ताण वाढतो. चतुर्थीसाठी यंदा विद्युत खात्याने पूर्व तयारी केली असून वीजपुरवठा उपलब्ध आहे. प्रत्येक मतदारसंघातील पथदीप पेटणार याची काळजी खाते घेणार आहे. सध्या पथदीप आणि वीज खांबांच्या कामासाठी उपयोगी ठरणारे लिफ्ट उपलब्ध नाही, त्यासाठी निविदा खुली करण्यात आली आहे. लवकरच सहा नवीन लिफ्ट खात्याच्या ताफ्यात जोडले जाईल, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
‘वीज खात्यावर कामाचा अतिरिक्त ताण’
विद्युत खात्याकडे स्वतःचे पथदीप आणि वीजखांबांची देखरेख करण्याची जबाबदारी आहे. त्या व्यतिरिक्त पर्यटन खात्याकडून बसवण्यात आलेले पथदीप, गोवा औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित येणाऱ्या औद्योगिक वसाहती आणि पथदीप योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम खात्याने बसवलेल्या खांबांची देखरेखदेखील विद्युत खात्याला करावी लागणार आहे. त्यामुळे खात्यावर कामाचा अतिरिक्त ताण आहे. त्यासाठी प्रत्येक साहाय्यक अभियंत्याच्या अंतर्गत एक कनिष्ठ अभियंता मतदारसंघात असणार आहे, असे ढवळीकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.