

पणजी: मगो नेते तथा मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याविरुद्ध कोविड-१९ नियमांच्या उल्लंघनप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यास झालेला विलंब माफ करण्याची तपास अधिकाऱ्यांची विनंती फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
२४ जानेवारी २०२२ रोजी मडकई मतदारसंघाचे तत्कालीन उमेदवार सुदिन ढवळीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सामाजिक अंतराचे पालन न करता आणि तोंडाला मास्क न लावता गर्दी केल्याचा आरोप होता.
पोलिसांचा दावा असा...
तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात अर्ज सादर करून कोरोना काळातील विविध कामांचा वाढलेला व्याप, कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्न आणि बंदोबस्ताची कर्तव्ये यांमुळे आरोपपत्र वेळेत न्यायालयात सादर करता आले नाही, असा दावा केला होता. मात्र, या अर्जाला तीव्र विरोध करताना सुदिन ढवळीकर यांच्या वकिलांनी पोलिसांचे हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.