Vasco: वास्को रेल्वेस्थानकाजवळील फ्लायओव्हर अचानक बंद केल्याने पादचाऱ्यांचे हाल

कोणतीही पुर्वसूचना न दिल्याने अनेकांची गैरसोय, पूल असुरक्षित असल्याचे रेल्वेचे मत
Vasco Railway Station
Vasco Railway Station Dainik Gomantak
Published on
Updated on

Vasco: वास्को रेल्वे स्थानकानजीकचा सर्वात जुना उड्डाण पदपूल सावर्जनिक वापरासाठी काल गुरुवारपासून बंद करण्यात आला. रेल्वेने कोणतीही पूर्वसूचना न देता पूल बंद केल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला. शेकडो लोकांना गैरसोय सहन करावी लागली. लोकांच्या नाराजीनंतर रेल्वेने हा पूल असुरक्षित असल्याचे आढळून आल्याने बंद केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, रेल्वे पूलाचे काम उद्यापासून सुरू होणार असल्याची माहीती वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर दिली.

Vasco Railway Station
Goa Government: ...तर गोव्यातील खाजगी रुग्णालयांची होणार चौकशी; आरोग्य खात्याचे नवे परिपत्रक

वास्को शहरातील स्वातंत्र्य पथ मार्ग ते बायणातील माता सेकंडरी स्कुलला जोडणारा रेल्वे उड्डाण पदपूल रेल्वे स्थानकानजीकच आहे. वास्कोतील रेल्वे मार्गावर बायणाला जोडणारे दोन उड्डाण पदपूल आहेत. तर एक पूल मेस्तावाडा ड्रायवरहिल भागाला जोडणारा आहे. हे तिन्ही पूल लोखंडी आहेत. या तीन पुलापैकी बायणातील माता सेकंडरी स्कुलपर्यंत जोडला गेलेला पदपूल जवळपास पन्नास वर्षे जुना आहे. आजही या पुलाचा वापर नागरिकांकडून केला जातो.

दरम्यान गुरुवारी सकाळी हा पूल पादचाऱ्यांसाठी खुला होता. मात्र, दुपारी हा पूल बंद केल्याने पादचाऱ्यांना मनस्ताप झाला. कुठून वाट काढावी हेच लोकांना समजेना. शेवटी लोकांनी वास्को ते बायणा रस्त्याची वाट धरली. आयओसी नाक्यावर असलेल्या दुसऱ्या पदपुलापर्यंत लोकांना पायपीट करावी लागली. पूल बंद करणार असल्याची पूर्वसूचना रेल्वेने जनतेला दिली नव्हती. त्यामुळे लोकांचा गोंधळ उडाला.

Vasco Railway Station
Mahadayi Water Dispute: 'म्हादई'प्रश्नी अमित शाह यांनी गोव्याला दिलेले आश्वासन म्हणजे 'डबल गेम'

या पुलाचा वास्को शहरात कामधंद्यानिमित्त तसेच बाजारहाटीसाठी येणाऱ्या लोकांना आधार होता. आता हा पूल खुला होण्याची शक्यता नसल्याने लोकांची गैरसोय होणार आहे. या पुलाच्या बायणातील पायथ्याशी माता शाळा आहे. येथील विद्यार्थ्यांनाही याच पुलाचा आधार होता.

रेल्वेने पुलाच्या प्रवेशद्वारावर पत्रे लावून पुलाची वाट दोन्ही बाजूनी कायमची बंद केली आहे. हा पूल सार्वजनिक वापरासाठी असुरक्षित वाटत असल्याने तो बंद करण्यात येत असल्याचा एक फलक रेल्वेने त्या पत्र्यांवर लावलेला आहे. दरम्यान वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी शुक्रवारी रेल्वे पुलाची पाहणी केली. वास्को आणि बायणा जोडणाऱ्या जीर्ण ओव्हरब्रिजची दुरुस्ती उद्यापासून सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com