Knee Implant in Goa: एआय म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स हा शब्द वैद्यकीय क्षेत्रातही परवलीचा बनलेला असतानाच दक्षिण गोव्यातील व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पोर्ट्स इंज्युरी या क्षेत्रातील निष्णात सर्जन डॉ. अमेय वेलिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण गोव्यातील पहिलीच रोबोटिक सर्जरी करून गुडघ्याचे रोपण करण्यात आले.
वास्तविक अशा शस्त्रक्रिया पारंपारिक पद्धतीने केल्या जातात मात्र व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या रुग्णाचे मांडीचे (फेमुर) हाड कमकुवत असल्याने त्यांच्यावर पारंपरिक पद्धतीने शस्त्रक्रिया करणे अशक्य होते.
त्यामुळेच ही शस्त्रक्रिया CURIS या रोबोटकडून करण्यात आली. या रोबोटच्या कृत्रिम बुद्धिमत्तेने सीटी स्कॅन प्रतिमा प्री-लोड केल्या गेल्या. ज्यामुळे या रोपणाच्या यांत्रिक अक्षाशी पूर्णपणे संरेखित केले गेले. मिलरच्या साहाय्याने हाड कापण्यात आले.
त्यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. मिलरच्या साहाय्याने केलेल्या शस्त्रक्रियेची अचूकता परिपूर्ण असून त्यात त्रूटी राहण्याची शक्यता शुन्याच्याही कमी असते, असे सांगण्यात आले.
डॉ. वेलिंगकर हे व्हिक्टर हॉस्पिटलशी २००३ पासून म्हणजे गेल्या २० वर्षांपासून जोडलेले जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. त्यांनी व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये जॉइंट रिप्लेसमेंटची सुरवात केली आहे. याशिवाय त्यांनी गेल्या २० वर्षांत फूल फ्लेक्सिअन नी, नॅचरल नी आणि कॉम्प्लेक्स हिप रिप्लेसमेंट यांसारख्या सांधे बदलण्याच्या इतर अनेक प्रगतीचा पुढाकार घेतला आहे. या रोबोटिक शस्त्रक्रियेने त्यांच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.