Sonsodo Garbage Plant: सोनसडो कचऱ्यावर कोट्यवधींचा खर्च; नागरिकांत संताप

व्यवस्थापनावरच खर्च जास्त, तपशीलाबाबतही संशय
Sonsodo Garbage Plant
Sonsodo Garbage PlantDainik Gomantak

Sonsodo Garbage Plant: सोनसडो कचरा प्रकल्प अनेक वादांमध्ये गुरफटलेला आहे. येथील समस्या सोडविण्याऐवजी त्या आणखीन जटिल होत चाललेल्या आहेत. त्यातच केवळ कचरा व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरत आहे. शिवाय ज्या पद्धतीने हा खर्च केला जात आहे त्याबद्दल संशयही व्यक्त केला जात आहे.

Sonsodo Garbage Plant
Flower Rate Rises: गोव्यात चतुर्थीनिमित्त फुलांना मागणी वाढली, दरही चढे

कॉमेक्स कंपनी कचऱ्याची प्रक्रिया मोफत करीत असे व त्यातून त्यांना जो नफा होत असे त्यातील काही भाग नगरपालिकेलाही देत असे. पण या कंपनीनंतर कचरा प्रक्रिया व व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे.

आता सोनसोडो प्रकल्पात प्लॅटफॉर्म बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. त्याच बरोबर कचरा व्यवस्थापन महामंडळ २५ टीपीडी बायोमेथानेशन प्लांट उभारण्याच्या विचारात असल्याचे कळते. आता तर कचरा उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार साळगाव व काकोडा कचरा प्रकल्पात नेला जात आहे. त्यावरही लाखो रुपये खर्च केले जात आहे.

नागरिक म्हणतात...

  • सध्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा फायदा घेऊन नगरपालिका कचरा विल्हेवाट संदर्भात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण केल्यासारखे दाखवत आहे, असे डॉ. रॉसलिन परेरा यांचे मत आहे.

  • शेडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांच्या म्हणण्यानुसार केवळ तीन वर्षांत नगरपालिकेने केवळ ओला कचरा वेगळा करण्यासाठी सहा कोटी रुपया खर्च केले आहेत. मात्र त्यातून एक किलो सुद्धा खत निर्माण झालेले नाही याचेच आश्र्चर्य वाटत आहे.

  • नगरपालिकेने सुरवातीला कचरा प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी तीन ५ टीपीडी बायोमेथानेशन प्लांटचा प्रस्ताव पुढे केला. जेव्हा मायकल लोबो कचरा व्यवस्थापन मंत्री होते तेव्हा त्यांनी सात ५ टीपीडी बायोमेथानेशन प्लांटचा प्रस्ताव खर्चात दुपटीने वाढ करून आणला, असे कार्लोस ग्रासियस याने सांगितले. पूर्वी जे तीन प्लांट प्रस्तावित केले होते, त्यातील केवळ एकच तयार झाला. तो सुद्धा आता कार्यरत नाही, असे त्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com