G-20 Summit Goa 2023: आरोग्य योजनांची यशस्वी अंमलबजावणी

विशेष पाहणी दौरा: आयुष्मान भारत, डायलेसिस अभियानाचा समावेश
G-20
G-20Dainik Gomantak

G-20 Summit Goa 2023: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गोवा सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाशी भागीदारी करत अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याचे आज दिसून आले.

राज्यात होऊ घातलेल्या जी - 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर अशा प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांचा विशेष दौरा आज करण्यात आला.

जी-20 आरोग्य कार्य गटाच्या 17 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत गोव्यात नियोजित दुसऱ्या बैठकीपूर्वी युनिसेफच्या पाठबळाने हा दौरा आयोजित करण्यात आला होता.

भारताच्या जी - 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, आरोग्य क्षेत्रातील, तीन ट्रॅक प्राधान्याने निश्चित करण्यात आले आहेत.

यात आरोग्यविषयक आपत्कालीन सज्जता आणि प्रतिबंध; औषध निर्माण क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करणे, खोर्ली  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राबवले जाणारे आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य अभियान आणि आयब्रेस्ट डिव्हाईसद्वारे, स्वस्थ महिला स्वस्थ गोवा कार्यक्रमांतर्गत तंत्रज्ञान नवोन्मेश यांचा यात समावेश होता.

क्रिकेटपटू युवराज सिंह यांच्या यूवीकॉन समर्थित उपक्रमाद्वारे तंत्रज्ञानविषयक प्रयोग करत, धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्तनांच्या कर्करोगासाठीची तपासणी केली जाते.

G-20
Carlos Ferreira: सरकारने सूचना स्वीकारणे म्हणजे विरोधी पक्षाचा विजय

स्वस्त व सुरक्षित डायलेसिस सेवा

या दौऱ्यात, प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी देखील दाखवण्यात आली. पीएमडीएनपी पोर्टलवर, सर्व डायलिसिस केंद्रांना एकत्रित करण्यात आले असून त्याद्वारे मूत्रपिंड नोंदणी तयार केली जात आहे.

तसेच  एक राज्य एक डायलिसिस अंतर्गत राज्यात आणि नंतर संपूर्ण देशात पोर्टेबिलिटी सुनिश्चित केली जाते. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेंतर्गत राज्यातील रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा दिली जाते.

राज्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात 100 पेक्षा जास्त डायलिसिस मशिन्स असून त्याद्वारे सुरक्षित आणि सर्वांना परडवणारी डायलेसिस सेवा दिली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com