Carlos Ferreira: सरकारने सूचना स्वीकारणे म्हणजे विरोधी पक्षाचा विजय

कार्लुस फरेरा ः ‘आप’च्या आमदारांनी दिशाभूल थांबवावी
MLA Carlos Ferreira
MLA Carlos FerreiraDainik Gomantak

विरोधी पक्षांनी दिलेल्या सूचना सरकारने मान्य करणे म्हणजेच हा विरोधी पक्षाचा विजय असे म्हणत ‘आप’च्या आमदारांनी लोकांची दिशाभूल थांबवावी, असे मत काँग्रेसचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी व्यक्त केले आहे. पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.

आमदार अ‍ॅड. फेरेरा म्हणाले, की आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांचे आरोप निराधार असून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांकडून सूचना मागितल्या आणि सरकारने त्या मान्य केल्या, तर तो विरोधकांचा विजय मानला पाहिजे. आम्ही इथे नाटक करायला किंवा लोकांशी खोटे बोलायला आलो नाही.

MLA Carlos Ferreira
Goa Mining : एका महिन्याच्या आत सर्व खाणी सोडाव्यात!

व्हिएगस यांनी प्रथम हे समजून घेतले पाहिजे की त्यांनी चर्चेदरम्यान कृषी आणि कोमुनिदाद विधेयकातील दुरुस्तीला विरोध केला होता. मला माहीत आहे मी विधानसभेत काय बोलतो. मी कुठल्याच प्रकारची दिशाभूल करत नाही आणि करणार नाही.

विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारकडे आवश्यक तितके संख्याबळ आहे. त्याआधारे ते विधेयक मंजूर करून घेऊ शकतात. यावेळी फेरेरा यांनी व्हिएगसचा दावा खोडून काढण्यासाठी उच्च न्यायालयाचा निकालही सादर केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com