पणजी : हिंदू रक्षा महाआघाडीतर्फे आज परशुराम जयंतीच्या मुहुर्तावर गोवा फाईल्सचं प्रकाशन केलं जाणार आहे. प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी याआधीच तशी घोषणा केली आहे. मात्र गोवा फाईल्सवरुन आता गोव्यात पुन्हा वादंग होण्याची चिन्हं आहेत. (Subhash Velingkar will publish Goa Files today news updates)
सुभाष वेलिंगकर यांनी परशुरामच गोव्याचे रक्षणकर्ते आहेत. त्यामुळे फ्रान्सिस झेवियरला ‘गोंयचो सायब’ म्हणणे चुकीचे असल्याचं वक्तव्य केलं होतं. गोव्यामध्ये होली इंक्विजिशन ही क्रूर यंत्रणा आणण्यास फ्रान्सिस झेवियर हाच पूर्णपणे जबाबदार होता, असं म्हणत गोव्यात होली इंक्विजिशनने अडीचशेहून अधिक वर्षे केलेल्या जुलमी अत्याचारांची माहिती आताच्या गोव्यातील नव्या पिढीला देणं गरजेचं आहे. यासाठीच 3 मे रोजी ‘गोवा फाईल्स’ गोमंतकीयांसमोर ठेवणार असल्याचं वक्तव्य हिंदू रक्षा महाआघाडी गोवाचे राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केलं होतं. आता वेलिंगकरांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटू लागले आहेत.
दरम्यान वेलिंगकरांच्या या वक्तव्यानंतर विविध स्तरांमधून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांना ‘गोंयचो सायब’ म्हणू नका, अशा तऱ्हेचा सुभाष वेलिंगकर यांनी चालविलेला प्रचार हा धार्मिक भावना दुखावणारा आहे. कारण सेंट फ्रान्सिस झेव्हियर हे आता केवळ एका धर्माचे नाहीत. त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. ते आता लोक दैवत ठरले आहेत.आज हिंदूना कट्टरवादी बनून सुभाष वेलिंगकर यांना राजकीय इंक्विजिशन आणण्याचे आहे का, असा सवाल फादर व्हिक्टर फेर्राव उपस्थित यांनी केला होता.
तर सेंट फ्रान्सिस झेविअरबाबत आक्षेपार्ह विधान करून सुभाष वेलिंगकर गोव्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वेलिंगकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री मिकी पाशेको यांनी केली आहे. मिकी यांनी याप्रकरणी कोलवा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दुसरीकडे टीएमसी नेते चर्चिल आलेमाव यांनीही सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वेलिंगकरांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत गोव्यातील जातीय आणि धार्मिक सलोखा वेलिंगकर धोक्यात आणत असल्याचा निशाणा आलेमाव यांनी साधला आहे. वेलिंगकरांनी दुसऱ्या धर्मांचा आदर करावा अन्यथा गोवा सोडून जावं, अशी तीव्र प्रतिक्रिया चर्चिल आलेमाव यांनी दिली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.