सुभाष वेलिंगकर दुसरे इंक्विजिशन आणू पाहत आहे : फादर व्हिक्टर फेर्राव

सेंट फ्रान्सिस झेव्हियरवरील वक्तव्यानंतर वेलिंगकर वाद आणखी पेटला
Fr. Victor Ferrao
Fr. Victor FerraoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांना ‘गोंयचो सायब’ म्हणू नका, अशा तऱ्हेचा सुभाष वेलिंगकर यांनी चालविलेला प्रचार हा धार्मिक भावना दुखावणारा आहे. कारण सेंट फ्रान्सिस झेव्हियर हे आता केवळ एका धर्माचे नाहीत. त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. ते आता लोक दैवत ठरले आहेत.आज हिंदूना कट्टरवादी बनून सुभाष वेलिंगकर यांना राजकीय इंक्विजिशन आणण्याचे आहे का, असा सवाल फादर व्हिक्टर फेर्राव उपस्थित यांनी केला.

Fr. Victor Ferrao
म्हापसा बाजाराची प्रवेशद्वारे पुन्हा व्यापाऱ्यांनी व्यापली!

शेकडो वर्षापूर्वी सेंट फ्रान्सिस झेव्हियर हे काळाशी सुसंगत वागले. त्यावेळी ती त्यांची गरज होती. कारण त्यांना ख्रिस्ती धर्माचा प्रसार करायचा होता. यात अडचर होता तो नवं कॅथलिक झालेले गोवेकर, मुसलमान आणि कॅथलिक बनून खोटेपणाने जे लोक राहत होते त्यांचा. या लोकांना शोधून काढण्याचे आव्हानही त्यांच्यापुढे होते. त्यावेळी इक्विजिशनचा गोव्यातील कॅथलिकांना प्रचंड त्रास झाला होता. त्यांच्या जखमा अजून भरुन निघालेल्या नाहीत. आमच्या पूर्वजांनी हा त्रास सहन केलेला आहे. मलाही त्यांनी केलेले इक्विजिशन योग्य वाटत नाहीत, मात्र ह्या त्या काळतील गोष्टी आहेत. त्या आज सुसंगत वाटत नाहीत, असेही फादर पुढे म्हणाले आहेत.

Fr. Victor Ferrao
एनसीसी कॅडेट्ससाठी गोव्यात विशेष नौकानयन शिबिर

दरम्यान, सुभाष वेलिंगकर यांनी जी काही वक्तव्य केली आहेत, त्यामुळे गोव्यात धार्मिक कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. आता वेलिंगकरांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही काही ख्रिस्ती बांधवांनी केली आहे. यामध्ये काही आमदारही आहेत. मिकी पाशेको यांनी तर पोलिस स्थानकात तक्रारही दाखल केली आहे. सुभाष वेलींगकर यांनी आपल्या विधानात म्हटले असे आहे की, सेंट फ्रान्सिस झेव्हियर हे कधीच ‘गोंयचो सायब’ होऊ शकत नाहीत. तो मान परशुरामांना जातो. वेलिंगकरांनी असेही म्हटले आहे की, इक्विजिशन ही संस्था गोव्यात आणण्यात सेंट फ्रानिसस झेव्हियर हे जबाबदार होते. शेकडो वर्षापूर्वीच्या अत्याचाराची माहिती नव्या पिढीली व्हावी यासाठी वेलिंगकर 3 मे पासून 22 दिवसांची यात्रा काढणार आहे.

यासंदर्भातील, गोमन्तक टीव्हीवरील चर्चेत फेर्राव म्हणाले की, ‘गोंयचो सायब’ हा शब्द भाषेतला नाही. त्यांना परशुरामाचा गाैरव करण्यासाठी दुसरा शब्द सापडला नाही का, हे वेलिंगकरांच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे, असा आरोप फेराव यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com