Subhash Velingkar: वेलिंगकरांवर कोणती कारवाई होणार? जामिनावरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

DNA Testing of St Francis Xavier's Remains: वेलिंगकरांवर अटकेची कारवाई झाल्यास संपूर्ण गोवा पेटून उठेल, असा सज्जड इशारा देत राज्य सरकारच्या दडपशाहीचा वेलिंगकर समर्थक हिंदू बांधवांनी जोरदार निषेध केला
DNA Testing of St Francis Xavier's Remains: वेलिंगकरांवर अटकेची कारवाई झाल्यास संपूर्ण गोवा पेटून उठेल, असा सज्जड इशारा देत राज्य सरकारच्या दडपशाहीचा वेलिंगकर समर्थक हिंदू बांधवांनी जोरदार निषेध केला
Subhash VelingkarDainik Gomantak
Published on
Updated on

Saint Xavier DNA Test Row

पणजी: जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर शवप्रदर्शन सोहळा दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला असतानाच झेवियर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करून धार्मिक सलोखा बिघडवल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी सुभाष वेलिंगकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उद्या (सोमवारी) न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीनंतर त्यांच्यावर कोणती कारवाई होणार, हे स्पष्ट होईल. या घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्य सरकारने प्रा. वेलिंगकर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे पोलिसांनीही त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या जवळची मित्रमंडळी तसेच काही हिंदू संघटनांच्या नेत्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात पोलिस पाठवून माहिती घेतली जात असून अद्याप त्यांना यश मिळालेले नाही.दरम्यान, वेलिंगकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने डिचोली पोलिसांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) रात्री वेलिंगकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ खाली गुन्हा दाखल केला व त्यांना काल ५ रोजी चौकशीसाठी नोटीस बजावली होती. त्यांचा शोधही सुरू केला होता. मात्र, या नोटिशीनुसार पोलिस ठाण्यात उपस्थित न राहता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे.

DNA Testing of St Francis Xavier's Remains: वेलिंगकरांवर अटकेची कारवाई झाल्यास संपूर्ण गोवा पेटून उठेल, असा सज्जड इशारा देत राज्य सरकारच्या दडपशाहीचा वेलिंगकर समर्थक हिंदू बांधवांनी जोरदार निषेध केला
Subhash Velingkar: कुतिन्होंसह 500 आंदोलकांविरुद्ध गुन्हे नोंद; वेलिंगकरांना दुसरी नोटीस, पोलिसांचा शोध सुरूच

वेलिंगकरांच्या समर्थनार्थ हिंदू बांधव म्हापशात एकवटले

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची डीएनए चाचणी करण्याची मागणी ही प्रा. सुभाष वेलिंगकर सरांची नव्हेच, तर यापूर्वीच बऱ्याच जणांनी ती केलेली आहे. त्यानुसार आम्ही ती मागणी फक्त उचलून धरली आहे. जर वेलिंगकरांवर अटकेची कारवाई झाल्यास संपूर्ण गोवा पेटून उठेल, असा सज्जड इशारा देत राज्य सरकारच्या दडपशाहीचा वेलिंगकर समर्थक हिंदू बांधवांनी जोरदार निषेध केला.

आज सकाळी म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिराच्या प्रांगणात ‘भारत माती की जय संघटने’च्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी वेलिंगकरांच्या समर्थनार्थ बैठक घेत त्यांच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला. तसेच हिंदू समाजाने एकसंध व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तत्पूर्वी उपस्थितांकडून श्रीदेव बोडगेश्वराला गाऱ्हाणे घालण्यात आले. शेकडोंच्या संख्येने हिंदू संघटनांचे पदाधिकारी तथा सदस्य यावेळी हजर होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com