Subhash Velingkar: कुतिन्होंसह 500 आंदोलकांविरुद्ध गुन्हे नोंद; वेलिंगकरांना दुसरी नोटीस, पोलिसांचा शोध सुरूच

St. Francis Xavier DNA Test Row: राज्यात सध्या निर्माण झालेल्या धार्मिक तणावाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवरून गोव्यात जाणीवपूर्वक सांप्रदायिक तणाव निर्माण केल्याचा आरोप करत भाजपवर टीका केली आहे
St. Francis Xavier DNA Test Row: राज्यात सध्या निर्माण झालेल्या धार्मिक तणावाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवरून गोव्यात जाणीवपूर्वक सांप्रदायिक तणाव निर्माण केल्याचा आरोप करत भाजपवर टीका केली आहे
Pratima CoutinhoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल सुभाष वेलिंगकर यांना अटक करा, अशी मागणी करत शनिवारी मडगावात रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर श्रेयवादावरून आज हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, या विषयाची धग अद्याप कायम आहे.

याप्रकरणी फातोर्डा (Fatorda) पोलिसांनी प्रतिमा कुतिन्हो यांच्यासह ५०० ज्ञात-अज्ञात आंदोलकांविरुद्ध आज विविध गुन्हे नोंद केले.

दक्षिण गोव्यातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शनिवारचा संपूर्ण दिवस मडगाव येथील रस्त्यावर ठाण मांडून प्रशासनाला गुडघे टेकवायला लावणारे मडगाव येथील आंदोलन रविवारी फुसका बार ठरले. या आंदोलनाचे श्रेय एकट्या प्रतिमा कुतिन्हो या स्वतः लाटू पाहतात, हे दिसून आल्यावर आम आदमी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनातून अंग काढून घेतले. तथापि, मी आंदोलन मागे घेत आहे पण आम्ही इथेच थांबणार नाही. सरकारच्या प्रत्येक चुकीच्या कामाचा पर्दाफाश करणार आहोत. मी सुभाष वेलिंगकर यांच्या जामीन अर्जाविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे, असे प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या.

भाजपकडून सांप्रदायिक तणाव; राहुल

राज्यात सध्या निर्माण झालेल्या धार्मिक तणावाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवरून गोव्यात जाणीवपूर्वक सांप्रदायिक तणाव निर्माण केल्याचा आरोप करत भाजपवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, ‘आरएसएस’च्या एका माजी नेत्याने मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण देशामध्ये संघ परिवाराकडून अशा कारवाया सुरू आहेत. याला सर्वोच्च स्तरावरून पाठिंबा आहे. गोव्यात भाजपची रणनीती स्पष्ट आहे. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागाचे शोषण करताना लोकांमध्ये फूट पाडणे, हरित पट्ट्याचे अवैध रूपांतर करून पर्यावरणीय नियमांना बगल देऊन नैसर्गिक आणि सामाजिक वारशाची लूट चालविल्याचे राहुल यांचे म्हणणे आहे.

मुख्यमंत्र्यांचा पलटवार

गोव्यातील धार्मिक तणावाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवरून भाजपवर सडकून टीका करतानाच भाजपने पर्यावरणीय नियमांना बगल देऊन नैसर्गिक आणि सामाजिक वारशाची लूट चालविल्याचे म्हटले आहे. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जोरदार पलटवार केला आहे. गोव्याची निसर्गसंपदा अबाधित राहावी, यासाठी मी घेतलेल्या काही महत्त्वपूर्ण निर्णयांची इतिहासदेखील नोंद घेईल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

St. Francis Xavier DNA Test Row: राज्यात सध्या निर्माण झालेल्या धार्मिक तणावाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवरून गोव्यात जाणीवपूर्वक सांप्रदायिक तणाव निर्माण केल्याचा आरोप करत भाजपवर टीका केली आहे
Subhash Velingkar: वेलिंगकरांविरुद्ध आंदोलक आक्रमक; अनेक ठिकाणी तक्रारी दाखल, अटकेसाठी हालचाली सुरु

वेलिंगकर भूमिगत; महाराष्ट्रात शोध

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करून धार्मिक सलोखा बिघडवल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी सुभाष वेलिंगकर यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. पहिल्या नोटिशीला प्रतिसाद न दिल्याने त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी आज दुसऱ्यांदा नोटीस बजावली. मात्र, पणजीतील त्यांचे घर बंद असल्याने ही नोटीस त्यांच्या घराच्या दारावर चिकटविली आहे. त्यांना आज संध्याकाळी ५ वा. डिचोली पोलिस स्थानकात उपस्थित राहावे, असे बजावले आहे. भूमिगत वेलिंगकर यांचा शोध पोलिस गोव्यासह महाराष्ट्रातही घेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com