Goa News : शीतपेय कंपनी अधिकाऱ्यांची मनमानी

सुभाष फळदेसाई : संयुक्त बैठकीला अधिकारी गैरहजर राहिल्याने संताप
officer Meeting
officer MeetingGomantak Digital Team
Published on
Updated on

सांगे : गावकऱ्यांच्या हिताविरुद्ध काही होत असल्यास आपण खपवून घेणार नाही. आपण कायम लोकांसमवेत राहू. कंपनीला उत्पादन सुरू राहायला हवे तर त्यांनी लोकांसमवेत येऊन आपली बाजू मांडायला हवी होती. पण कंपनीचे अधिकारी निर्धारित वेळेत बैठकीला हजर न राहता मनमानी करीत आहेत.

लोकांना शीतपेय कंपनी नको असल्यास आपण लोकांसमवेत राहू,असे सांगेचे आमदार तथा समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. कोटार्ली येथील श्री सातेरी सभामंडपात प्रशासकीय अधिकारी, नागरिक आणि कंपनी अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी शीतपेय कंपनीच्या गॅसवाहू टँकर च्या खाली सापडून मंज्योत च्यारी आणि आनंद या दोघा जणांचा बळी गेला.

officer Meeting
Goa Budget Session 2023: अर्थसंकल्‍प सर्वस्‍पर्शी; प्रत्‍येकासाठी फायदेशीर- सदानंद शेट तानावडे

तेव्हा उद्‍भवलेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीला मंत्री सुभाष फळदेसाई, उपजिल्हाधिकारी मिलिंद वेळीप, मामलेदार गौरव गावकर, उप अधीक्षक नीलेश राणे, पंच विठ्ठल गावकर व भावेश गावकर उपस्थित होते. फळदेसाई म्हणाले ,कंपनी अधिकारी वेळेत घटनास्थळी आले असते, तर जमाव प्रक्षुब्ध झाला नसता.

officer Meeting
Goa Budget 2023: 26844 कोटींचा अर्थसंकल्‍प, ग्रामीण जीवनमान उंचावण्‍याचे लक्ष्‍य

बैठकीची मुख्यमंत्र्यांना दिली माहिती!

पेप्सी कंपनी समाजात कोणताही दान धर्म करीत नसून सामाजिक निधी असूनही कोणालाही मदत करीत नाही. आपण अनेकदा शेरा मारून पत्र व्यवहार केला, पण कंपनी दाद देत नसल्याचे बैठकीत मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. सर्वमान्य तोडग्यासाठी प्रशासनासोबत बैठक बोलावूनही शीतपेय कंपनीचे अधिकारी बैठकीला गैरहजर राहिले या संदर्भात थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून बैठकीची कल्पना दिली,असे फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com