Navratri 2022 : महिलांबाबतच्‍या गुन्ह्यांप्रती सदाच सतर्क राहणाऱ्या करिश्मा प्रभू

गुन्‍हे रोखण्‍यासाठी लोकांचा विश्‍‍वास महत्त्‍वाचा; पोलिस उपनिरीक्षक करिश्मा प्रभू
Navratri 2022
Navratri 2022 Dainik Gomantak

प्रमोद प्रभुगावकर

Navratri 2022 : उसगाव-फोंडा येथील करिश्मा कृष्‍णा प्रभू यांना लहानपणापासूनच खाकी वर्दीचे आकर्षण. त्‍यामुळेच त्‍या या क्षेत्राकडे वळल्‍या. उसगावसारख्या ग्रामीण भागातील एक युवती पोलिस निरीक्षक होते हा कौतुकाचा विषय. महिलांशी संबंधित अनेक प्रकरणांचा तपास त्‍यांनी केला. तो करताना संबंधित महिला तसेच तिच्‍या घरच्या लोकांचा विश्वास संपादन केला. त्यातून अनेक महत्त्वाचे दुवे हाती लागले. म्‍हणूनच लोकांचा विश्वास मिळविणे गरजेचे आहे, असे त्‍या सांगतात.

Navratri 2022
CM Pramod Sawant : आता पर्वरीतील वाहतूक कोंडी संपणार

2016-17 मध्‍ये करिश्‍‍मा प्रभू प्रथम कामावर रुजू झाल्या त्या वाहतूक पोलिस विभागात जुने गोवे येथे. तेथे त्यांनी चार महिने काम केले व मायणा-कुडतरी, कुडचडे या पोलिस स्‍थानकांवर काम केले. सध्या त्या मायणा-कुडतरी पोलिस स्‍थानकावरच पोलिस उपनिरीक्षक म्‍हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, सर्वसामान्य लोकांमध्ये पोलिसांबाबत आता पूर्वग्रह राहिलेले नाहीत. तपासकामात त्यांचे चांगले सहकार्यही मिळत आहे. त्‍यामुळे अनेक किचकट प्रकरणांचा तपास लावणे शक्‍य झाले आहे. बलात्कारासारख्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतात, पण तरीही लोकांच्या सहकार्याने आपण तपासकाम करू शकले, असे त्‍या अभिमानाने सांगतात.

आता महिला-मुली या करिश्‍‍मा यांच्‍याशी अधिक मोकळ्या प्रकारे बोलतात. एवढेच नव्हे तर स्वतः संपर्क साधून आपल्‍या समस्‍या मांडतात. त्यामुळे आपली काळजी घेणारी, आपणाला न्याय मिळवून देणारी कोणी तरी आहे हा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे.

पण त्यांच्या मते महिलांबाबतच्‍या गुन्ह्यांचे उच्चाटन करायचे असेल तर महिलांनी सतर्क, खंबीर राहण्याची गरज आहेच शिवाय समाजात स्वतःला जबाबदार म्‍हणविणाऱ्यांनीही जागृत राहणे आवश्‍‍यक आहे. कुठेही महिलांचा छळ होत असेल तर पोलिसांना कळवा, असे आवाहन त्‍यांनी केले.

किशोरवयीन मुलींनी सावध, सतर्क रहावे

1. किशोरवयीन मुलींची फसवणूक होण्‍याचे प्रमाण वाढले आहे. त्‍याबाबत करिश्‍‍मा म्हणतात की, या वयातील मुलींनी कोणावरही अंधविश्वास टाकू नये. पालकांचेही आपल्‍या मुलीवर बारीक लक्ष असावे. याचसंदर्भात त्यांनी आणखी एका मुद्याकडे लक्ष वेधले.

2. हा मुद्दा आहे खासगी शाळांत विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या बसेसचा. या बसेसमधील वाहक-चालकांशी मुलांची जास्त घसट तर होत नाही ना, याकडे पालकांबरोबरच शिक्षकांनीही नजर ठेवणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांमुळे ते आता आवश्‍‍यक बनले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com