Subhash PhalDesai: सांगे मतदारसंघाचा विकास हेच ध्‍येय- सुभाष फळदेसाई

लोकांचे सहकार्य गरजेचे; रस्‍ता हॉटमिक्‍सिंग डांबरीकरण कामाचा प्रारंभ
Subhash Phal Desai
Subhash Phal DesaiDainik Gomantak
Published on
Updated on

सांगे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. लोकांच्या सहकार्याने ते काम पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्‍वाही समाजकल्याण खात्‍याचे मंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी दिली. सांगे पालिका क्षेत्रातील रस्‍ता हॉटमिक्स डांबरीकरण कामाच्या शुभारंभावेळी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्षा प्रीती नाईक, नगरसेवक कॅरोल क्रुझ, संगमेश्‍‍वर नाईक, श्‍‍वेता नाईक तारी, रुमाल्डो फर्नांडिस, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, माजी आमदार वासुदेव गावकर, सरपंच राजेश गावकर, प्रज्योत गावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

Subhash Phal Desai
BJP: शेवटी सगळे रस्ते भाजपकडेच?

सुमारे 25 किलोमीटर अंतराच्‍या या हॉटमिक्स डांबरीकरणावर सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सांगेवासीयांची या रस्‍त्‍याची मागणी लक्षात घेऊन हे काम करण्यात आले असून फक्त पालिका क्षेत्रच नाही तर मतदारसंघातील, पंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचेसुद्धा डांबरीकरण करण्यात येणार आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले.

Subhash Phal Desai
Goa Traffic Issue: म्हापशात वाहतुकीचा फज्जा!

सांगे मतदारसंघाचा खुंटलेला विकास आता परत मार्गी लागत असल्याचे नगरसेवक संगमेश नाईक यांनी सांगितले. लोकांची प्रमुख मागणी असलेल्‍या हिंदू स्मशानभूमीचे काम रखडले होते व ते आता मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या प्रयत्नाने मार्गी लागणार आहे.

हा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रिपदापासून वंचित होता. पण आता फळदेसाई यांना मंत्रिपद मिळाल्‍याने ते त्‍याचा लाभ आपल्‍या मतदारसंघाला मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असेही नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com