School Hijab Row: मुख्याध्यापकावरील आरोप गैर!

School Hijab Row: ‘केशव स्मृती’च्या विद्यार्थ्यांचा दावा : समर्थनार्थ वास्कोत काढली रॅली
School Hijab Row:
School Hijab Row: Dainik Gomantak
Published on
Updated on

School Hijab Row: केशव स्मृती शाळेच्या विद्यार्थ्यांनी हिजाब प्रकरणी निलंबित केलेल्या मुख्याध्यापकाच्या समर्थनार्थ रॅली काढून पाठिंबा दर्शवला. तसेच मुख्याध्यापकावरील आरोप निराधार असल्याचा दावा केला.

School Hijab Row:
Goa Ganesh Chaturthi 2023: राज्यात चॉकलेट मोदकांना मागणी

विद्यार्थ्यांसाठी मशिदीत एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. तसेच मुलींनी हिजाब घालण्याच्या संदर्भात या कार्यशाळेत माहिती दिली जात होती. या कार्यशाळेचे आयोजन ''इस्लामिक स्टुडंट ऑर्गनायजेशन'' या संघटनेने केले होते.

विशेष म्हणजे, अशा कार्यशाळेचे शिक्षण खात्याने कसलेच परिपत्रक काढलेले नव्हते. दरम्यान वरील प्रकरण उजेडात आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेसह अनेक बिगरसरकारी संघटनांनी दाबोळी येथे केशवस्मृती विद्यालयाजवळ जमून मुख्याध्यापक गावकर व संस्थापक कोरगावकर यांना जाब विचारला.

School Hijab Row:
Goa Express: सहा प्रवाशांच्या प्रकृतीत सुधारणा

दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर शाळा व्यवस्थापकाने तत्काळ प्राचार्य गावकर यांना निलंबित केले.

दरम्यान, आज बुधवारी दुपारी केशव स्मृती शाळेच्या विद्यार्थ्यांनी हिजाब प्रकरणी निलंबित मुख्याध्यापकाच्या समर्थनार्थ रॅली काढली.

आम्हाला न्याय द्या, ‘केशव स्मृती हायस्कूल जिंदाबाद’ असे नारे देऊन मुख्याध्यापकावरील आरोप निराधार असल्याचा दावा केला.

दरम्यान,बायणातील सरकारी उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना झुआरीनगरच्या मशिदीत पाठविल्याबद्दल काही हिंदू संघटनांनी संबंधित मुख्याध्यापकांना जाब विचारला. याप्रकरणी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी मुख्याध्यापकांना अहवाल पाठविण्याची सूचना केली आहे.

हा तर ‘शालेय जिहाद’!

‘विहिंप’चे संजू कोरगावकर यांनी सदर संघटनेबाबत संशय व्यक्त केला. हा प्रकार म्हणजे ‘शालेय जिहाद’ आहे अशी टीका करून शैक्षणिक संस्थांनी अशा संघटनाच्या

पत्रकांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. काही विद्यार्थिनींनी हिजाब घालण्यास नकार दिल्यावर त्यांच्यावर हिजाब ची सक्ती करण्यामागे कोणता अजेंडा आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. किरण नाईक यांनीही चौकशीची गरज व्यक्त केली.

यापूर्वीही आम्ही विद्यार्थ्यांसमवेत मंदिर, चर्च आणि मशिदींना भेटी दिल्या आहेत. मला का निलंबित केले आहे, हे मला माहीत नाही.‘स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’च्या (एसआयओ) निमंत्रणावरून जातीय सलोख्यासाठी दाबोळीतील मशिदीला भेट दिली. आमच्या शाळेतील २१ विद्यार्थ्यांना हिजाबची सक्ती किंवा धार्मिक विधी करण्यास भाग पाडले, हे खोटे आहे. -शंकर गावकर, मुख्याध्यापक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com