Goa Express: सहा प्रवाशांच्या प्रकृतीत सुधारणा

Goa Express: रेल्वेत विषबाधा: दोघे अत्यवस्थ, बेळगावात उपचार
Goa Express
Goa ExpressDainik Gomantak

Goa Express: ट्रेनमधील प्रवाशांना गुंगीचे औषध पाजून लुटण्‍याच्‍या घटना वाढलेल्‍या असतानाच काल गोव्‍यातून सुटलेल्‍या निजामुद्दीन एक्‍सप्रेसमधील आठ युवकांना अशाच प्रकारे गुंगीचे औषध घातलेले चॉकलेटस्‌ खायला देऊन त्‍यांना लुटण्‍याची घटना घडली असून या आठही युवकांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले.

विषबाधा झालेल्या त्या आठ रेल्वे प्रवाशांवर बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सहा जणांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. पण दोघे अत्यवस्थ आहेत. सर्वजण बेळगाव रेल्वेस्थानकावर आल्यानंतर सोमवारी (ता.११) रात्री एकच गोंधळ उडाला. याप्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, हा प्रकार नेमका कसा घडला, याची माहिती घेतली जात आहे.

Goa Express
Illegal Goa Mining: बेकायदा चिरेखाणीप्रकरणी खाण संचालकांना कोर्टाचे निर्देश...

राजसिंग लक्ष्मीप्रसाद खंगार (वय १७), पुष्पेंद्र रामकिशोर रजक (१९, दोघेही रा. लरखान टिकामगरू मध्यप्रदेश), कृष्णा मनसाराम (१८), ओमप्रकाश मुनसी (१८), अजय प्रकाश पालवी (२३), आकाश श्रीवन पालवी (१८, चौघेही रा. सिर्वा, जि. खांडवा, राज्य मध्य प्रदेश), शिवा आणि विशाल अशी अन्य दोघांची नावे असून, त्यांचा पत्ता अद्याप समजू शकलेला नाही. वरील सर्वजण नोकरीच्या शोधार्थ गोव्याला गेले होते. ते पुन्हा हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वेगाडीतून प्रवास करीत होते. या प्रकरणात सध्‍या रेल्‍वे पोलिस तपास करीत आहेत, अशी जनसंपर्क अधिकारी अनिष हेगडे यांनी दिली.

‘ते’ भामटे सावर्डेत उतरले !

हेगडे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, या डब्‍यात २५ ते ३० वयोगटातील आणखी तीन युवक होते. त्‍यांनी या आठ युवकांशी मैत्री साधून त्‍यांच्‍याशी गोड गोड बोलण्‍यास सुरुवात केली, नंतर त्‍यांना आपल्‍याकडील चॉकलेटस्‌ आणि कुरकुरे खायला दिले. याच खाद्य पदार्थांत गुंगीचे औषध असावे, असा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. या आठ युवकांना गंडवणारे ते तीन युवक सावर्डेला उतरल्‍याची माहिती अन्‍य प्रवाशांकडून मिळाली आहे. या संभाव्‍य चोरट्यांचा रेल्‍वे पोलिस शोध घेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com