Goa IFFI 2023: ‘द फेदरवेट’ : कठोर परिश्रमाचे फळ

Goa IFFI 2023: दिग्दर्शक रॉबर्ट कोलोड्नी : ‘इफ्फी’त झाला अमेरिकन चित्रपटाचा आशिया प्रीमियर
Goa IFFI 2023
Goa IFFI 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa IFFI 2023: 54 व्या इफ्फीमध्ये आमचा चित्रपट प्रदर्शित करणे आमच्यासाठी अर्थपूर्ण आहे. हा चित्रपट अनेक वर्षांच्या संशोधन आणि कठोर परिश्रमाचे फळ आहे, असे मत ‘द फेदरवेट’ चित्रपटाचे दिग्दर्शक रॉबर्ट कोलोड्नी यांनी व्यक्त केले. महोत्सवाचा शेवटचा चित्रपट म्हणून मंगळवारी इफ्फीत या अमेरिकन चित्रपटाचा आशिया प्रीमियर झाला.

Goa IFFI 2023
54 IFFI Goa: ‘सुवर्ण मयूर’साठी नामांकन मिळणेच मोठे; ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टी

पीआयबीद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना चित्रपट निर्माते रॉबर्ट कोलोड्नी यांनी सांगितले की, हा चित्रपट इटालियन-अमेरिकन बॉक्सर विली पेपच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. ज्याने बॉक्सिंगमध्ये सर्वाधिक लढतींचा विक्रम केला आहे. त्याच्या कारकिर्दीत 241 फाईट्सचा विक्रम होता.

बॉक्सरच्या गावी चित्रपटाच्या शूटिंगपासून, त्याचे वास्तविक बॉक्सिंग हातमोजे वापरण्यापर्यंत, हा चित्रपट सत्य आणि वास्तविकता दर्शवतो, असे दिग्दर्शकानी स्पष्ट केले. त्यांनी असेही सांगितले की, या चित्रपटातील पात्रे अशा लोकांची आहेत जे दिवंगत बॉक्सरला खऱ्या आयुष्यात ओळखत होते.

Goa IFFI 2023
Goa Teacher: ...म्हणून, चौथ्या मजल्यावरून उडी मारून शिक्षिकेने संपविले जीवन

भूमिकेत समर्पण

अभिनेता जेम्स मॅडिओ यांनी सांगितले की, विली पेपचे जीवन अनुभवणे आणि त्यांचे पात्र करणे हा एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी अकल्पनीय अनुभव होता. बॉक्सिंग रिंगमध्ये पाऊल टाकणे आणि हा स्वतंत्र चित्रपट बनवणे हा एक चमत्कार आहे. बॉक्सर विली पेपच्या भूमिकेत येण्यासाठी अनेक वर्षांचे समर्पण आणि संशोधन एकाच वेळी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक होते; परंतु मुक्त करणारे होते.

विली पेपचा गतिमान जीवन इतिहास, क्रीडा नाटकातील कारस्थान आणि मानवी नाटकाचे वास्तव यामुळे माहितीपूर्ण, मनोरंजक आणि जवळची कथा बनवण्यासाठी मला आकर्षित केले. आंतरराष्ट्रीय मंचावर सिनेमाद्वारे संवाद साधणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

- रॉबर्ट कोलोड्नी, दिग्दर्शक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com